आशिष विशाळ हा आपलाच सहकारी : आमदार सुरेश धस
बीड ( वास्तव पोस्ट ) : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी राज्यभरात आक्रोश मोर्चे काढण्यात आले होते. यावेळी आशिष विशाळ हे नाव चर्चेत आले होते. या व्यक्तीने संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना मदत करायची असल्याचे सांगून अनेक अधिकाऱ्यांकडून पैसे घेतल्याचा आरोप मराठा आंदोलकांनी केला होता. त्यामुळे मराठा कार्यकर्त्यांनी त्याला बेदम चोप…
