महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त शस्त्र प्रदर्शन ; वाहतुकीचे नियम पाळा, व्यसनांपासून दूर रहा : डॉ.महेश्वर रेड्डी

विद्यार्थ्यांशी संवाद साधताना पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, व्यासपीठावर डावीकडून विराज कावडिया, अशोक नखाते, संदीपकुमार गावित, सी.एस.नाईक जळगाव ( वास्तव पोस्ट ) : विद्यार्थ्यांनी सिगारेट व इतर व्यसनांपासून दूर राहावे, वाहतुकीचे नियम पाळावेत, आणि पोलिस दलात करिअर घडवण्यासाठी प्रयत्नशील रहावे, असे मार्गदर्शन पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी केले. महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त आयोजित शस्त्र,…

Read More

सर्वात मोठी स्टार्टअप इकोसिस्टम म्हणून भारत लवकरच पहिल्या क्रमांकावर पोहचेल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

NATIONAL STARTUP DAY 2025 : सर्वात मोठी स्टार्टअप इकोसिस्टम म्हणून भारत लवकरच पहिल्या क्रमांकावर पोहचेल, आणि भारताची निर्विवाद स्टार्टअप राजधानी महाराष्ट्रच असेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘राष्ट्रीय स्टार्टअप दिवस २०२५’ कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केला. मुंबई ( वास्तव पोस्ट ) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय स्टार्टअप दिवस २०२५’ कार्यक्रमाचे मुंबई येथे…

Read More

लाडकी बहीण योजना : पुढील हप्ता २६ जानेवारीपर्यंत मिळणार : महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेचा पुढील हप्ता २६ जानेवारीपर्यंत देण्यात येणार आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मंत्रालयात मंत्रीपरिषद बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना दिली. मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिला लाभार्थ्यांना जुलै महिन्यापासून लाभ…

Read More

ए आय, क्रिप्टो, इलेक्ट्रिक एनर्जी, ड्रोन आणि अँटी ड्रोन गुंतवणुकीसाठी आघाडीची क्षेत्रे

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजेंस), बायोटेक, क्रिप्टो, ड्रोन आणि अँटी ड्रोन, इलेक्ट्रिक एनर्जी ही गुंतवणुकीसाठी आघाडीची क्षेत्रे आहेत, असे मत नवीन कल्पना, तंत्रज्ञानावर आधारित स्टार्टअप्स, स्टार्टअप्स मधील गुंतवणूक या विषयी द्वितीय चर्चा सत्रात जिओ जेन नेक्स्टचे प्रमुख अमेय माशेलकर, जीतो इनक्युबेशनचे अध्यक्ष जिनेंद्र भंडारी, व्हेंचर कॅटालिस्ट अँड नाईन युनिकॉर्न, सह-संस्थापक,…

Read More

महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त शस्त्र प्रदर्शन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : पोलीस स्थापना दिनानिमित्त शुक्रवार, दि.१७ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ९:४५ ते दुपारी ३:३० वाजेपर्यंत शहरातील पोलीस स्केटिंग ग्राऊंड, पोलीस मुख्यालय, नवीन बस स्टॅन्ड समोर, जळगाव येथे शस्त्र, श्वानपथक, पोलीस बँड, बॉम्ब शोधक व नाशक पथक, वायरलेस यंत्रणा यांचे प्रदर्शन जळगाव जिल्हा पोलीस दल, भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व…

Read More

वार्षिक स्नेहसंमेलन २०२५ : विद्यार्थ्यांनी केलेल्या वेशभूषांमुळे मू.जे. महाविद्यालय झाले बॉलीवूडमय

पुष्पा आणि श्रीवल्ली जळगाव ( वास्तव पोस्ट ) : मूळजी जेठा महविद्यालयामध्ये चैतन्य २०२५ वार्षिक स्नेहसंमेलना अंतर्गत आज विद्यार्थ्यांनी बॉलीवूड मधील विविध पात्रांची वेशभूषा करून महाविद्यालयामध्ये नवचैतन्य निर्माण केले. जुन्या आणि नव्या चित्रपटामधील विविध नायक-नायिका, खलनायक आणि विनोदी पात्रांची वेशभूषा करून विद्यार्थी महाविद्यालयात आले होते. यावेळी महाविद्यालयात बॉलीवूड थीम वर आधारित स्पर्धा सुद्धा आयोजित करण्यात…

Read More

राज्यात एकाच दिवशी दूध भेसळ तपासणी मोहिम ; दोषींवर कारवाई होणार : मंत्री नरहरी झिरवाळ

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : आरोग्याच्या दृष्टिकोनातून दूध हे शरीरासाठी खूप उपयुक्त असून मोठ्या प्रमाणावर दुधाचा वापर लहान बालकांपासून ते वृद्ध व्यक्तींपर्यंत पिण्यासाठी केला जातो. मात्र राज्यात काही ठिकाणी दुधात भेसळीचे प्रकार होत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यानुसार अन्न व औषध प्रशासन विभागाने आज एकाच दिवशी दूध भेसळ तपासणी मोहीम राबविण्यात येऊन १ हजार…

Read More

वावडदे महावितरण उपकेंद्रास सहव्यवस्थापकीय संचालक यांची भेट

वावडदे ( वास्तव पोस्ट ) : जळगाव तालुक्यातील वावडदे येथे महावितरणाच्या सब स्टेशन येथे आज बुधवार दि.१५ जानेवारी रोजी सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप जगदाळे IAS यांनी मुख्य अभियंता इब्राहिम मुलाणी जळगाव झोन व अधीक्षक अभियंता अनिल महाजन जळगाव, तसेच वावडदा कक्ष कार्यालयाचे कनिष्ठ अभियंता आकाश सोनवणे यांनी भेट दिली. या भेटीत वावडदा विभाग प्रधानमंत्री किसान ऊर्जा…

Read More

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालया तर्फे स्व.खाशाबा जाधव जयंती व राज्य क्रीडा दिन साजरा

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जळगाव जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रीडा संकुल येथे राज्य क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा शारीरिक…

Read More

समुद्री सामर्थ्याचा नवा अध्याय! शक्तिशाली आणि आत्मनिर्भर भारताच्या ३ जहाजांचे जलावतरण

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारतात निर्मित सुरत आणि निलगिरी (युद्धनौका) तसेच वाघशीर (पाणबुडी) या तीन महत्त्वाच्या जहाजांचे राष्ट्राला समर्पण करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमीतून भारतीय नौदलाने एकाच वेळी युद्धनौका, विनाशिका आणि पाणबुडी कार्यान्वित करून स्वावलंबनाच्या दिशेने केलेली ही ऐतिहासिक वाटचाल आहे. ‘मेक इन इंडिया’ योजनेच्या माध्यमातून…

Read More

धोकादायक नायलॉन मांजा विक्रेत्यांविरुध्द “सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न” अंतर्गत गुन्हे दाखल !

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : दरवर्षी डिसेंबर व जानेवारी महीन्यात काही लोक मकर संक्रांतीचे निमित्तीने तसेच काही लोक एक छंद म्हणुन पतंग उडवतात. बऱ्याच ठिकाणी पतंगबाजी मध्ये वापरण्यात येणारा दोरा हा नायलॉन पासून बनलेला असतो. सदर नायलॉन मांजा हा इमारतीमध्ये तसेच झाडांमध्ये अडकतो. सदर मांजा हा सहजासहजी तुटत नसल्याने परिणामी नायलॉन मांजा रस्त्याने येणारे…

Read More

कॉलर का उडवतोस ? या क्षुल्लक कारणातून झालेल्या वादात एकाची गळा चिरून हत्या !

छत्रपती संभाजीनगर ( वास्तव पोस्ट ) : येथील उस्मानपुऱ्यात असलेल्या एका अपार्टमेंटमध्ये १९ वर्षीय विद्यार्थ्याची त्याच्या फ्लॅटमध्ये घुसून अज्ञात मारेकऱ्यांनी गळा चिरुन निघृण हत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवार दि.१४ रोजी रात्री दहाच्या सुमारास घडली. ऐन संक्रांतीच्या दिवशी घडलेल्या या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. हत्या झालेल्या विद्यार्थ्याचे नाव प्रदीप विश्वनाथ निपटे (वय १९) असे…

Read More

मंत्री आदिती तटकरे यांनी महिला व बालविकास विभागातील योजनांचा घेतला आढावा

मुंबई (वास्तव पोस्ट ) : महिला व बालविकास विभागातर्फे महिला आणि बालकांच्या विकासासाठी विविध योजना व उपक्रम राबविण्यात येतात. या योजना व उपक्रमांना गती द्यावी, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी विभागाच्या आढावा बैठकीत दिले. यावेळी विभागाचे सचिव अनुपकुमार यादव उपस्थित होते. यावेळी मंत्री अदिती तटकरे यांनी राज्यातील महिला व बालकांच्या विकासासाठी…

Read More

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आनंदवन येथील संस्थेला ३ कोटी ८ लाखांचा निधी

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा येथील आनंदवन महारोगी सेवा समिती संस्थेला कुष्ठरुग्णांचे उपचार आणि पुनर्वसनासाठी १कोटी ८६ लाख रुपये तर, आनंद अंध, मुकबधीर आणि संधीनिकेतन दिव्यांग कार्यशाळेसाठी १ कोटी २२ लाख रुपये असे एकूण ३ कोटी ८ लाख रुपयांचा निधी तातडीने वितरीत करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी दिले…

Read More

झांबरे विद्यालयात कातळ शिल्पावर व्याख्यान

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : ए.टी झांबरे माध्यमिक विद्यालयात कातळ शिल्प या गुढ आणि रहस्यमय शिल्पा बद्दल राजापूरचे संशोधक आणि सेवानिवृत्त मुख्याध्यापक ए.के. मराठे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये असलेल्या जांभ्या दगडाच्या कातळावर सुमारे दहा ते पंधरा हजार वर्षांपूर्वी माणसाने दगडी हत्यारांच्या सहाय्याने विविध प्राणी पक्षी मनुष्याकृती अशी असंख्य चित्रे…

Read More
error: Content is protected !!