केळी क्लस्टरच्या अंमलबजावणी नियोजनासाठी जैन हिल्स येथे ‘केळी पीक चर्चासत्र’
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : गेल्या ३० वर्षामध्ये जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादकांनी टिश्युकल्चर, ठिबक सिंचन, फर्टिगेशन व हायटेक पॅकेज ऑफ प्रॅक्टीसेस, फ्रुट केअर मॅनेजमेंट, पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट आणि निर्यात या क्षेत्रात मोठी भरारी घेतली असून केळी पीक क्लस्टर योजनेमुळे जळगाव जिल्हा हे केळी निर्यातीचे हब म्हणून जगाच्या बाजारपेठेत नावलौकीक मिळवेल.निर्यातीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असे…