झांबरे विद्यालयात वार्षिक बक्षीस वितरण सोहळा संपन्न
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : केसीई सोसायटी संचालित ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात वार्षिक बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे सचिव ॲड.प्रमोद पाटील होते. तर प्रमुख पाहुणे शाळेच्या माजी ग्रंथपाल अलका गोपाळ नेहेते उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन आणि स्वागत गीताने झाली. त्यानंतर मार्च २०२४ च्या एस.एस.सी. शालांत परीक्षेत…