सचिनच्या एका पोस्टने १२ वर्षीय सुशीला मीनाचं नशीब उजाळले ! राजस्थानचे कृषी मंत्री मदतीला धावले
प्रतापगड ( वास्तव पोस्ट ) : राजस्थानच्या प्रतापगड जिल्ह्यातील १२ वर्षांची मुलगी तिच्या गोलंदाजीच्या ॲक्शनमुळे प्रचंड चर्चेत आली आहे. क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणारा महान फलंदाज सचिन तेंडुलकर याने या मुलीचा व्हिडीओ एक्स या सोशल मीडियावर पोस्ट केला होता, तेव्हापासून सुशीला मीना नामक चिमुकलीचे नशीब पालटले आहे. सचिन तेंडुलकरही सुशीला मीनाची बॉलिंग ॲक्शन पाहून प्रभावित…