बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्टतर्फे चौधरी वाड्यात कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा ७३ वा स्मृतिदिन साजरा
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : बहिणाबाई कान्हदेशच्या कवयित्री होत्या असे म्हणणे, म्हणजे त्यांच्यावर अन्याय करण्यासारखे ठरेल, त्या तर वैश्विक पातळीच्या महान कवयित्री होय, कारण त्यांनी भूगोलाच्या सीमारेषा कधीच ओलांडल्या आहेत. त्यांचे साहित्य तर साऱ्या विश्वाचे धन होय. आपण भाग्यवान आहोत की, त्यांच्या कविता आपल्यासाठी उपलब्ध आहे, असे सुप्रसिद्ध कवी संजय चौधरी यांनी मनोगत व्यक्त…