यावेळेस तरी यश मिळणार का ? महामार्गावर ‘त्या स्पॉटवर’ दुरुस्तीचे काम नव्याने सुरु…!
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : शहरातून जाणाऱ्या महामार्गावर जिल्हा उद्योग केंद्रासमोर महामार्गाचा काही मीटर अंतराचा भाग वारंवार खचत असल्याने सगळ्यांसाठीच हा विषय डोकेदुखीचा झाला आहे. या ठिकाणी विविध प्रकारे खड्डे तसेच खचणाऱ्या भागाचे दुरुस्तीचे काम केले गेले. मात्र प्रत्येक वेळी हाती अपयश आले. कारण काही दिवसातच पुन्हा हा मार्ग खचुन तेथे खड्डे तयार होतात….
