राज्य आपत्ती निवारण विभागाची आढावा बैठक आज मुंबईत संपन्न

मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : राज्यभरात करण्यात आलेला मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी राज्य आपत्ती निवारण विभागाची आढावा बैठक आज मुंबई येथे पार पडली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित होते. यावेळी प्रामुख्याने राज्यातील एसडीआरएफच्या टीमची संख्या वाढवावी, ठाणे महानगरपालिकेच्या टीडीआरएफप्रमाणे प्रत्येक मनपाने स्वतःची आपत्कालीन पथक…

Read More

पोर्शे अपघात प्रकरण : सुरेंद्र कुमार आणि विशाल अग्रवाल यांना ३१ तारखेपर्यंत पोलीस कोठडी

पुणे ( वास्तव पोस्ट न्यूज ) : पुण्यातील कल्याणीनगर पोर्शे अपघात प्रकरणी आज एक मोठी बातमी समोर आली आहे. अल्पवयीन मुलाचे आजोबा सुरेंद्रकुमार अग्रवाल आणि वडिल विशाल अग्रवाल या दोघांना ३१ तारखेपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. पुण्यातील कल्याणीनगर येथील हिट अँड रन प्रकरणात गाडीचा चालक बदलण्याचा प्रयत्न झाल्याप्रकरणी त्या अल्पवयीन मुलाचे आजोबा सुरेंद्र कुमार…

Read More

बबनबाई जवरीलाल हिरण माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा इ.१०वी चा निकाल ९९.०२ टक्के

कजगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून राज्यभर घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यात महात्मा गांधी विद्या प्रसारक मंडळ संचलित बबनबाई जवरीलाल यात हिरण माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कजगाव शाळेचा इयत्ता १० वी निकाल ९९.०२% लागला विद्यालयातून १०३ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ठ झाले…

Read More

मानव सेवा माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९८.२४ टक्के ; वैष्णवी धनगर शाळेत प्रथम

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून मार्च २०२४ मध्ये राज्यभरात घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यात जळगाव येथील मानव सेवा माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९८.२४% लागला असुन, त्यात ३० विदयार्थी विशेष प्राविण्यासह, २१ विदयार्थी प्रथम श्रेणीत तर०५ विदयार्थी व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले.१) प्रथम…

Read More

‘रेमल चक्रीवादळ’ पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर धडकले ; पर्यटकांना बाहेर न पडण्याचा इशारा

कोलकता ( वास्तव पोस्ट न्यूज ) : बांगलादेशाच्या सिमेहुन निघालेले ‘रेमल चक्रीवादळ’ पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर धडकल्यामुळे किनारपट्टी भागात प्रचंड नुकसान झाले आहे.यामध्ये कोलकाता येथील एकाचा मृत्यू झाला. चक्रीवादळासोबत आलेल्या मुसळधार पावसामुळे त्या परिसरातील घरे, शेत पाण्याखाली गेली आहेत. ताशी १३५ किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या या वाऱ्यांमुळे किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तीनही किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये चक्रीवादळाचा…

Read More

दरमहा ७० ते ८० लाख हफ्ता घेतांना लाज वाटत नाही का ? रविंद्र धंगेकर यांचे गंभीर आरोप !

पुणे ( वास्तव पोस्ट न्यूज ) : पोर्शे कार अपघात प्रकरणानंतर पुण्यात पहाटेपर्यंत चालू असणारे पब आणि बार कोणाच्या आशीवार्दाने चालतात, हा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. याबाबत रविंद्र धंगेकर आणि सुषमा अंधारे यांनी उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले आहे. पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणात मद्यधुंद अल्पवयीन मुलाने भरधाव वेगाने कार चालवत दोन जणांचा…

Read More

शिवणकाम करणाऱ्या दांपत्याची मुलगी धनश्री जिरेमाळी ९५.४० टक्के गुणांसह अनुभूती स्कूलमध्ये प्रथम

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : जैन इरिगेशनचे संस्थापक पद्मश्री डॉ.भवरलालजी जैन यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या (दारिद्र्य रेषेखालील विद्यार्थ्यांसाठी) भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन संचलीत अनुभूती इंग्लिश मिडिअम स्कूलचा इयत्ता १० वीचा निकाल यंदाही १०० टक्के लागला आहे. यात धनश्री दत्तात्रय जिरेमाळी-प्रथम (९५.४०%), मुकूंद सदाशिव चौधरी – द्वितीय (९५.००%) व अश्विनी समाधान हरसोडे-तृतीय (९३.८० %),…

Read More

शारदा इंग्लिश मिडीयम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज कजगाव शाळेची १००% निकालाची परंपरा कायम

कजगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : माध्यमिक शालांत परिक्षेचा इयत्ता १०वी चा निकाल जाहीर झाला असून यामध्ये शारदा इंग्लिश मिडीयम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज कजगाव शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट निकालाने झेंडा रोवला असून शाळेची १००% निकालाची परंपरा कायम राखली आहे. सर्व ३३ विद्यार्थी ८०% पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत. कु. ममता जगदीश परदेशी ही…

Read More

शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात बियाणे उपलब्ध करून द्या अन्यथा रस्त्यावर उतरु: अमोल शिंदे

पाचोरा ( वास्तव पोस्ट न्यूज ) : भडगाव-पाचोरा खरीप हंगामाच्या लागवडीला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली असून परिसरातील प्रमुख पीक असणारे कापूस सध्या बाजारात उपलब्ध होत नसल्याने कापुस बियाण्याची टंचाई भासताना दिसत आहे. या संदर्भात भारतीय जनता पार्टीचे पाचोरा-भडगाव विधानसभा निवडणूक प्रमुख अमोल शिंदे यांनी आवाज उठवला असून प्रांताधिकारी यांना भाजपा पदाधिकारी यांच्या माध्यमातून निवेदन दिले…

Read More

पोर्शे कार अपघात: आरोपीचे ब्लड रिपोर्ट बदलले; ससूनच्या दोन डॉक्टरांना अटक

पुणे ( वास्तव पोस्ट न्यूज ) : गेल्या रविवारी पुण्यात कल्याणी नगर येथे झालेल्या अपघात प्रकरणी आज पुन्हा एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका बड्या बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने भरधाव वेगात मद्यधुंद अवस्थेत आलीशान पोर्शे कार चालवून रस्त्यावरील दोघांना उडवले होते. यानंतर आरोपीच्या रक्ताचे नमुने तपासण्यासाठी ससुन रुग्णालयात पाठवण्यात आले होते. मात्र, हे रिपोर्ट ससुन…

Read More

आयपीएल २०२४ च्या अंतिम सामन्यात हैदराबादचा धुव्वा उडवत केकेआर विजेता

चेन्नई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : आयपीएल २०२४ च्या अंतिम सामन्यात आज केकेआरने चॅम्पियन्सला साजेसा खेळ करत आयपीएल २०२४ च्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले. केकेआरच्या गोलंदाजांनी या विजयात सिंहाचा वाटा राहीला. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत केकेआरने हैदराबादला फक्त ११३ धावांवर रोखले. त्यामुळे केकेआरला विजयासाठी ११४ असे माफक आव्हान मिळाले. केकेआरने हे आव्हान ९.५ षटकात…

Read More

धुळ्यात उन्हाचा तडाखा; दोंडाईचा परिसरात उष्माघाताने दोन दिवसात ४ बळी

धुळे ( वास्तव पोस्ट न्यूज ) : सध्या वाढत्या तापमानाचा परिणाम सर्वत्र दिसून येत आहे. त्यातच धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात असलेल्या दोंडाईचा परिसरात दोन दिवसात ४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. धुळ्यात उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढतच असून तापमानाने ४४ ते ४५ अंशाचा आकडा पार केल्याने नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत आहे. तिव्र…

Read More

वाकोद येथे पोलीस भरती प्रशिक्षण व निशुल्क सराव चाचणी; गौराई स्पर्धा परीक्षा केंद्रातर्फे आयोजन

वाकोद ( वास्तव पोस्ट न्यूज ) : महाराष्ट्र शासनातर्फे यावर्षी १७४४१ जागांची महापोलीस भरती जाहीर करण्यात आलेली आहे. तसेच येणाऱ्या काळात सरळ सेवा, महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट ब, गट क व इतर परीक्षा देखील होणार आहेत. यासाठी भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन द्वारा वाकोद येथे गौराई स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आले आहे. पंचक्रोशीतील…

Read More

धक्कादायक : जळगाव जिल्हा रूग्णालयात गेल्या आठ दिवसांत ५० मृतदेह ; त्यापैकी १६ बेवारस !

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) :जळगाव जिल्हा रूग्णालयात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गेल्या ८ दिवसात रूग्णालयात तब्बल ५० मृतदेह आले आहे. त्यातील १६ मृतदेह हे बेवारस असल्याचे सांगण्यात आले आहे. सध्या जळगावात उकाडा प्रचंड वाढत चालला असुन उष्माघाताने हे मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र त्या पैकी हे एक कारण…

Read More

टीआरपी गेम झोनमध्ये लागलेल्या आगीत २७ जणांचा होरपळून मृत्यू ; १२ मुलांचा समावेश !

राजकोट ( वास्तव पोस्ट न्यूज ) : गुजरातच्या राजकोटमधील टीआरपी गेम झोनमध्ये शनिवारी संध्याकाळी लागलेल्या भीषण आगीत २७ जणांचा होरपळून मृत्यू झाला. मृतांमध्ये १२ लहान मुलांचाही समावेश असुन अनेकजण अद्याप बेपत्ता असल्याचेही सांगितले जात आहे. आग लागण्यामागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नसुन आगीची दुर्घटना ही शॉर्ट सर्किटमुळे घडल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान “टीआरपी…

Read More
error: Content is protected !!