Home » Archives for 2024-05-11

अचूक नियोजनातून करण पाटलांना मिळणार वाढीव मताधिक्य; पाचोरा मेळाव्यात निर्धार

पाचोरा | दि ११ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – सत्ताधार्‍यांबाबत जनतेत रोष असून प्रचार फेर्‍यांमध्ये लोक आपल्या सोबत राहतील असे दिसून आले आहे. तथापि, मतदानाआधीच्या शेवटच्या टप्प्यात गाफील राहू नका असा आवाहन वजा इशारा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पाचोर्‍यात आयोजीत मेळाव्यात दिला. तर, अचूक नियोजन करून करण पाटील यांना वाढीव मताधिक्य मिळवून देण्याचा निर्धार देखील…

Read More

भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) तर्फे राजाभाऊ वाजे यांना जाहीर पाठिंबा

नाशिक | दि. ११ ( वास्तव पोस्ट न्यूज )– नाशिक लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे जाहीर पाठिंबा देण्यात आला. आज दिनांक ११ मे २०२४ रोजी श्रमिक नगर अशोक नगर परिसरात पक्षाच्या वतीने कामगार बंधू व कार्यकर्ते यांनी प्रचार पत्र वाटप केले. प्रचार पत्रक वाटप करताना लोकशाही वाचवा, देश…

Read More

सुरेश जैन यांचा महायुतीस पाठींबा ; ठाकरे गटास धक्का

जळगाव | दि.११ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या पाचव्या टप्प्यात जळगाव लोकसभा मतदार संघात मतदान होणार आहे. मतदानाला दोन दिवस असतांनाच उद्धव ठाकरे गटास मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे नेते व माजी मंत्री सुरेश जैन यांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर आज दि.११ रोजी भाजपसह महायुतीच्या उमेदवारांना पाठींबा दिल्याचे घोषित…

Read More

युवा आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत पुण्याच्या आकाशला सुवर्ण पदक

पुणे | दि.११ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – कझाकिस्तानमध्ये अस्तानात २२ वर्षांखालील युवा आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत पुण्याच्या आकाश गोरखाने सुवर्णपदक पटकावले. या मुष्टियुद्ध स्पर्धेत २२ वर्षांखालील गटामध्ये वर्चस्व राखत २१ पदकांसह एकूण ४३ पदकांची कमाई केली. पुण्याच्या आकाशने ६० किलो गटाच्या अंतिम लढतीत कझाकिस्तानच्या रस्लन कुझेउबाएवचा ४-१ असा पराभव करून विजेतेपद जिंकले. मागील वर्षी…

Read More

जळगाव आणि रावेर लोकसभा मतदार संघात मतदानामुळे ११ ते १३ मे पर्यंत मद्यविक्री बंद

जळगाव | दि. १० ( वास्तव पोस्ट न्यूज ) – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ कार्यक्रमानुसार जळगाव जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघात १३ मे २०२४ रोजी मतदान होणार आहे. निवडणूक प्रक्रिया खुल्या, भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी संपूर्ण जळगाव जिल्ह्यात मतदान कालावधी संपण्याच्या ४८ तास अगोदरपासून ते मतदान संपेपर्यंत जिल्ह्यातील मद्यविक्री पूर्णत: बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी…

Read More
error: Content is protected !!