Home » Archives for 2024-05-09

म्हसावद येथे महाविकास आघाडीकडून मशाल रॅली

जळगाव | दि.९ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – तालुक्यातील म्हसावद येथे जळगाव लोकसभा मतदार संघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट तसेच महाविकास आघाडीच्या घटक पक्षांकडून भव्य मशाल रॅली काढण्यात आली. सविस्तर वृत्त असे की २०२४ लोकसभा सार्वत्रीक निवडणुक जळगाव मतदार संघाचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असुन जळगाव लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार करण…

Read More

पाचोर्‍यात निघाली भव्य मशाल रॅली; जोरदार जयघोषाने परिसर दुमदुमला

पाचोरा | दि. ९ (वास्तव पोस्ट न्यूज )– लोकसभा निवडणुकीचा प्रचार निर्णायक टप्प्यात आला असतांनाच आज सायंकाळी करण बाळासाहेब पाटील यांच्या प्रचारासाठी वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली शहरातून भव्य मशाल रॅली काढण्यात आली. जळगाव लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार करण बाळासाहेब पाटील यांच्या प्रचारासाठी पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघातील मविआच्या समर्थकांनी कंबर कसली आहे. गेल्या सुमारे पंधरा…

Read More

जैन इरीगेशन सिस्टिम लि. येथे जैन फूडपार्क व एनर्जी पार्क मध्ये मतदान जनजागृती

जळगाव | दि.९ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – २०२४ लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जळगाव जिल्ह्यातही शासकीय यंत्रणेमार्फत आणि विविध संस्थांमार्फत मोठ्या प्रमाणात जनजागृती होत आहे. त्याचप्रमाणे जैन इरीगेशन सिस्टिम लि.च्या जैन फूडपार्क व एनर्जीपार्क मध्ये मतदान जनजागृती करण्यात आली. गांधी रिसर्च फाउंडेशनचे सहकारी आणि जळगाव जिल्हा लोकसभा २०२४ चे अधिकृत आयकॉन…

Read More

सुरेशदादा जैन यांनी दिला शिवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा

जळगाव | दि.९ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – माजी मंत्री तथा आमदार सुरेशदादा जैन १९७४ पासून (४० वर्ष) सतत राजकारणात होते. १९८० पासून सक्रीय राजकारणात प्रवेश केल्यानंतर ते ३४ वर्ष आमदार होते. हिंदू हृदयसम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वप्रथम त्यांना मंत्रीपद दिले. बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या केलेल्या कार्याचा आढावा ज्यामध्ये जळगाव शहराचा सर्वांगिण विकास,…

Read More

बँक कॅशियरचा प्रामाणिकपणा ; १७,५०० रुपये खातेधारकास केले परत

कजगाव दि.९ (प्रतिनिधी) –दिपक अमृतकर | भडगाव तालुक्यातील बाजारपेठेचे गाव म्हणून कजगाव प्रसिद्ध आहे. गाव हे व्यापारी पेठ असल्याने गावात राष्ट्रीयकृत बँकेची शाखा आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीयकृत बँकेची एकच शाखा कजगाव येथे आहे. परिसरातील तसेच गावातील व्यापारी नागरिकांचे खाते हे या शाखेत आहेत. एकच राष्ट्रीयकृत बँक असल्याने बँकेत नेहमी खातेधारकांची वर्दळ असते….

Read More

कजगाव येथे महाराणा प्रताप यांची जयंती उत्साह साजरी

कजगाव दि.९ ( प्रतिनिधी ) –दिपक अमृतकर | आज महाराणा प्रताप यांची जयंती कजगाव शहरात मोठ्या उत्साहात वाजत गाजत साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त संपूर्ण गावातून शोभायात्रा काढण्यात आली. ढोल पथक तसेच पारंपरिक पोशाखात फेटे बांधून महिला व मुली यात सहभागी झाले होते. तसेच महाराणा प्रताप आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची वेशभूषा केलेले, आणि हनुमानाचे सोंग…

Read More

कजगाव येथे महावितरण अभियंता पद रिक्त असल्याने विज ग्राहकांची नाराजी

कजगाव दि.९ ( प्रतिनिधी ) –दिपक अमृतकर | भडगाव येथे महावितरणाच्या कार्यालयात बऱ्याच महिन्यांपासून अभियंता पद रिक्त असून ग्राहकांच्या तक्रारीचे समाधान वेळेवर होत नसल्याने विज ग्राहकांचे मोठ्या प्रमाणात हाल होऊन त्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. आपल्या समस्यांचे निवारण वेळेवर होत नसल्याची तक्रार गावातील नागरिकांकडून केली जात आहे. महावितरणाच्या या दिरंगाईच्या कारभारामुळे ग्राहकांमध्ये संतापाची लाट…

Read More

निर्मल जलसेवा भागविणार पाचोरेकरांची तहान ! महाराणा प्रताप जयंती दिनी जनतेच्या सेवेत रूजू

पाचोरा | दि.९ ( वास्तव पोस्ट न्यूज )– निर्मल सीड्स कंपनीच्या वतीने दिवंगत आमदार आर. ओ. तात्या पाटील यांच्या पुण्यस्मरणार्थ निर्मल जलसेवा आजपासून सुरू करण्यात आली आहे. निर्मल सीड्स कंपनीच्या वतीने सध्या सुरू असलेल्या कडक उन्हाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर निर्मल जलसेवा सुरू करण्यात आली आहे. याअंतर्गत महाराणा प्रताप चौक आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक, जारगाव चौफुली येथे…

Read More

लोकसभा निवडणुकीत क्रांतीची मशाल पेटवा : उन्मेषदादा पाटील

भडगावातील सभेत मविआ नेत्यांचा सत्ताधार्‍यांवर जोरदार हल्लाबोल भडगाव | दि.९ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – यंदाची लोकसभा निवडणूक ही देशातील विकासासाठी आणि दडपशाहीला चाप लावण्यासाठी आहे. या निवडणुकीत क्रांतीची मशाल पेटवून महाविकास आघाडीचे उमेदवार करण बाळासाहेब पाटील यांना निवडून देण्याचे आवाहन माजी खासदार उन्मेषदादा पाटील यांनी केले. ते भडगावात आयोजीत सभेत बोलत होते. याप्रसंगी…

Read More

मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता

मुंबई | दि.९ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – महाराष्ट्रात नागरिक उष्णतेच्या लाटेने हैराण असतांनाच पुढील चार दिवस अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पूर्व विदर्भात गारपीट तसेच वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊसाने हजेरी लावली आहे. विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रात काही भागात आज अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पुढील चार दिवस अवकाळी पावसाची शक्यता…

Read More
error: Content is protected !!