गडकोट, किल्ले हा आपला ठेवा; तो जपण्याचे काम करू – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुणे, दि. १९ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत किल्ले शिवनेरी येथे ‘शिवाई देवराई’ आणि वन उद्यानाचे लोकार्पण करण्यात आले. शिवनेरी संवर्धन आणि विकास प्रकल्पांतर्गत वन विभागाच्यावतीने किल्ले शिवनेरीवर अडीच एकर क्षेत्रावर तीन वनोद्यान व स्वतंत्र ‘शिवाई देवराई’…

Read More

खासदार हेमंत गोडसे यांच्या गाडीला दिल्ली येथे अपघात ; गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान

नाशिक, दि.१९ ( वास्तव पोस्ट न्यूज )– नाशिकचे शिंदे गटाचे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांच्या कारचा अपघात झाला आहे. राजधानी दिल्लीतील बी डी मार्गावर ही दुर्घटना घडली. या अपघातात हेमंत गोडसे यांना विशेष दुखापत झालेली नाही. मात्र गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान हेमंत गोडसे हे संसदेतील शिवजयंती उत्सव आटोपून ते…

Read More

ग्राहकांच्या कमाईवर बँक मॅनेजरचा डल्ला ; तब्बल अडीच कोटींचा अपहार

नवी दिल्ली,दि.१९ (वास्तव पोस्ट न्यूज )- आयसीआयसीआय या खासगी क्षेत्रातील बँकेच्या राजस्थानमधील शाखेत शाखा व्यवस्थापकाने तब्बल दोन कोटी रुपयांचा गंडा घालून अनेक वर्षांपासून ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे उघड़कीस आले आहे. उदयपूर येथील एका व्यक्तीने शाखा व्यवस्थापकाला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केल्यानंतर घोटाळा उघडकीस आला . राजस्थान पोलिसांचे एसपी अमित कुमार यांच्या नेतृत्वाखालील तपासात या घोटाळ्याचे…

Read More

महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या भूकंपाचे संकेत; शरद पवार गटातील बडा नेता भाजपमध्ये करणार प्रवेश?

मुंबई, दि.१९ ( वास्तव पोस्ट न्यूज )- राष्ट्रवादीतील (शरद पवार) एका बड्या नेत्याला पक्षात आणण्याच्या भाजपच्या जोरदार हालचाली सुरू झाल्याची माहित समोर येत आहे. हा नेता पश्चिम महाराष्ट्रातील असल्याचं सांगितलं जातंय. या नेत्याला दीर्घकाळ राज्यातील महत्त्वाची खाती सांभाळण्याचा अनुभव आहे. तसेच त्यांचं सहकार क्षेत्रातही मोठं नाव आहे. त्यामुळे भाजपसोबत जाणारा तो नेता कोण? अशी चर्चा…

Read More

राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी आशीष शेलार !आजच्या भेटीतुन चांगलीच फलश्रुती होईल : नेते प्रवीण दरेकर

मुंबई, दि.२० ( वास्तव पोस्ट न्यूज ) – भाजप नेते आशिष शेलार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली. आता मनसे देखील भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी यांच्या महायुतीत सहभागी होणार काय ? असा प्रश्न राजकीय वर्तुळात ऐकायला मिळत आहे . शेवटी काय तर, “सबका साथ सबका विकास.” मनसे नेते बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे यांनी…

Read More

अशोक जैन यांना स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार प्रदान;कराड येथील ४१ वे स्वातंत्र्यसैनिक अधिवेशन व माजी सैनिक भव्य मेळाव्यात पुरस्कार प्रदान

स्व. दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांना प्रदान करताना गोव्याचे माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय कायदा मंत्री रमाकांत खलप, शेजारी स्व. दादा उंडाळकर स्मारक समितीचे मुख्य विश्वस्त अॅड. उदयसिंह पाटील, विश्वस्त विजयसिंह पाटील व मान्यवर पदाधिकारी उंडाळ दि. १८ ( वास्तव पोस्ट न्यूज )– उंडाळ येथील स्व. दादा उंडाळकर ५० व्या…

Read More

राजकोट कसोटीत दुसऱ्या डावात यशस्वी जैस्वालचे तडाखेबंद द्विशतक ; टीम इंडिया मजबूत स्थितीत

राजकोट, दि.१८ ( वास्तव पोस्ट न्यूज )– राजकोट येथे खेळल्या जात असलेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामनातील दुसऱ्या डावात भारताचा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालने द्वीशतक झळकावले. यशस्वी जैस्वालने २३२ चेंडूत आपले द्विशतक पूर्ण केले. त्याने इंग्लंडविरुद्ध एका मालिकेत दुसऱ्यांदा द्विशतक झळकावून इतिहास रचला आहे. त्याचबरोबर अनेक दिग्गजांचे विक्रम देखील आपल्या…

Read More

धरणगावनजीक पुलाखाली कापूस व्यापाऱ्यास लुटले ;दीड कोटी घेऊन पोबारा

धरणगाव, दि.१७ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – धरणगाव येथील दुर्गेश इम्पेक्स जिनिंगचे जवळजवळ दीड कोटी रुपयांचे पेमेंट जळगावहून कारने नेले जात होते. व्यापाऱ्याची कार अडवून तब्बल दीड कोटी रुपयांची रक्कम तीन चोरट्यांनी लुटून नेली. ही घटना आज दुपारी पावणेदोन वाजता धरणगाव नजीक मुसळी फाट्याजवळ घडली. धरणगाव रोडवर उड्डाण पुलाखाली पैसे असलेली कार आली असता…

Read More

राजकोट कसोटीत भारताची आघाडी ; यशस्वी जैस्वालचे नाबाद शतक

राजकोट, दि.१७ ( वास्तव पोस्ट न्यूज )- राजकोटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना खेळला जात आहे. आज तिसऱ्या दिवशी दुसऱ्या डावात सलामीवीर यशस्वी जैस्वालने १२२ चेंडूचा सामना करत ९ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने शतक झळकावले. मात्र पाठीच्या दुखण्याच्या त्रास सुरु झाल्याने त्याला रिटायर्ट हर्ट व्हावे लागले. तत्पूर्वी त्याने शुबमन…

Read More

‘यूपीए’ सरकारने शेतकऱ्यांची दिशाभूल केली – पंतप्रधान मोदी ;

नवी दिल्ली,दि.१७( वास्तव पोस्ट न्यूज )– पंजाब-हरियाणाच्या शंभू सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु असताना, हरियाणामधील रेवाडी येथील जाहीर कार्यक्रमात, काँग्रेसप्रणित ‘यूपीए’ सरकारवर शेतकऱ्यांची दिशाभूल केल्याचा आरोप मोदींनी केला. ‘केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी योजना राबवत आहे’ असे पंतप्रधान मोदी म्हणाले. पंजाब व हरियाणातील शेतकरी किमान आधारभूत किमती संदर्भात कायदा करण्याच्या प्रमुख मागणीसाठी आंदोलन करत असून त्यासंदर्भात मोदींनी…

Read More

अन्यथा मी विधानसभा निवडणूक लढवणार नाही ; उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, दि.१७ ( वास्तव पोस्ट न्यूज )– आगामी लोकसभा निवडणुकीत आम्ही ज्या उमेदवाराला उभा करू त्याला तुम्ही खासदार केलं पाहिजे, अशी माझी अपेक्षा आहे. तुम्ही लोकसभेला आमच्या उमेदवाराला निवडून दिलं तरच मी विधानसभा निवडणुकीला उभा राहीन, अन्यथा मी निवडणूक लढवणार नाही, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. अजित पवार बारामतीकरांना म्हणाले, तुम्ही साथ…

Read More

‘कोल्हापुर प्रेस क्लब’च्या वतीने उत्कृष्ट पत्रकारीतेबद्दल पत्रकारांचा सन्मान

कोल्हापुर, दि.१७ ( वास्तव पोस्ट न्यूज )– ‘कोल्हापूर प्रेस क्लब’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्याला उपस्थित राहून पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पत्रकार बांधवांना सन्मानित केले. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, प्रेस…

Read More

बकासुराचा वाडा- एक प्राचीन गूढ !!

बकासुर हा एक कोकणी होता नव्हे तर तो वैभववाडीकर होता बकासुर हा एक कोकणी होता नव्हे तर तो वैभववाडीकर होता असं तुम्हाला सांगितले तर खर वाटेल काय?बकासुर आणि भीमाच्या युद्धाची कथा आपण महाभारतात ऐकली आहे. हा कथेतला बकासुर खरंच होता का? त्याचे खरोखरच भीमाशी युद्ध झाले होते का? तसे झाले असेल तर ते ठिकाण कोणते?…

Read More

स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार अशोक जैन यांना जाहिर

जळगाव दि. १६ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – सातारा जिल्ह्यातील उंडाळे ता. कराड येथे स्वातंत्र्य सैनिक दादा उंडाळकर यांच्या ५० व्या स्मृतीदिनानिमित्त ४१ वे स्वातंत्र्य संग्राम सैनिक अधिवेशन व माजी सैनिक मेळाव्याचे रविवारी ता.१८ ला आयोजन करण्यात आले आहे. अधिवेशनात यंदाचा स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार जळगावच्या जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.चे अध्यक्ष अशोक जैन…

Read More

हनुमान गढी ते राम मंदिर दरम्यान सुग्रीव पथ बांधणार ; भाविकांना राम मंदिर पर्यंत जाणे होणार सुलभ

अयोद्धया, दि.१६ ( वास्तव पोस्ट न्यूज )– अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनानंतर शहरातील लोकांची ये-जा वाढली आहे. मंदिरात प्रभू रामाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना अडचणींचा सामना करावा लागत असून ही बाब लक्षात घेऊन उत्तर प्रदेश सरकारने सुग्रीव पथ बांधण्याचा निर्णय घेतला आहे. सविस्तर वृत्त असे की उत्तर प्रदेश सरकारने सुग्रीव पथ नावाचा नवीन रस्ता तयार करण्याची घोषणा…

Read More
error: Content is protected !!