Home » Archives for 2024-02-23

चोपडा येथील नुतन प्रशासकीय इमारतीचे पालकमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन ; प्रशासकीय कामांना गती मिळणार

चोपडा, दि.२३ ( वास्तव पोस्ट न्यूज )– महसूल यंत्रणा ही गतिमान यंत्रणा म्हणून ओळखली जाते. चोपडा येथे अत्याधुनिक अशी प्रशासकीय इमारत बांधल्यामुळे कामाला गती येईल. नव्या इमारतीत नवी कार्यसंस्कृती रुजवा असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. तर राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी तालुका प्रशासनाला नव्या इमारतीसाठी शुभेच्छा देऊन आपले अनुभव…

Read More

गांधीवादी मूल्यशिक्षण प्रसाराच्या दृष्टीने उपयुक्त : कुलगुरू डॉ. शिर्के

शिवाजी विद्यापीठाचा जळगावच्या गांधी रिसर्च फौंडेशनसमवेत सामंजस्य करार कोल्हापूर,दि.२२ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – गांधीवादी मूल्यशिक्षण या विषयावरील अभ्यासक्रम सुरू करण्याबरोबरच अनेक उपक्रम गांधी अभ्यास केंद्रामार्फत येत्या वर्षभरात राबविण्यात येऊ शकतील, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी आज येथे केले.शिवाजी विद्यापीठाचे गांधी अभ्यास केंद्र आणि जळगाव येथील गांधी रिसर्च फौंडेशन यांच्यादरम्यान…

Read More

जळगाव मध्ये ३ मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालत;प्रलंबित खटले असणाऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन

जळगाव,दि.२३ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – वर्षानुवर्ष प्रलंबित राहणारे खटले, आर्थिक चणचण, वेळेचा अपव्यय या सर्व गोष्टी टाळण्यासाठी व आपसात सामोपचाराने तडजोड घडवुन वाद मिटवुन घेण्याकरीता राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार संपुर्ण देशात दि ३ मार्च, २०२४ रोजी एकाच दिवशी राष्ट्रीय लोकअदालत आयोजित करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा विधी सेवा…

Read More

जळगाव येथे नाशिक महसूल विभागीय क्रीडा स्पर्धेचे थाटात उद्घाटन

जळगाव, दि.२३( वास्तव पोस्ट न्यूज ) -जळगाव येथे नाशिक महसूल विभागीय स्पर्धेचे आज सकाळी उद्घाटन झाले. या स्पर्धेत नाशिक विभागातील पाच जिल्हे सहभागी झाले असून, ६०७ पुरुष खेळाडू तर १७७ महिला खेळाडू सहभागी आहेत. यात १४ क्रीडा प्रकार खेळले जाणार आहेत. त्यात ४८ सांघिक सामने , २०८ वैयक्तिक सामने असे एकूण २५६ सामने खेळवीले जातील…

Read More

लोकसभा २०२४: मार्च नंतर घोषणा ; आर्टिफिशियल इंटेलिजेन्स उमेदवारांवर ठेवणार नजर

नवी दिल्ली, दि.२३ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – लोकसभा निवडणूक २०२४ च्या तारखेच्या संदर्भात सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा १३ मार्च नंतर होण्याची शक्यता आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निवडणुकांची तारीख जाहीर करण्यापूर्वी निवडणूक आयोगा जम्मू- काश्मीरचा दौरा करण्याची शक्यता आहे. दरम्यान पश्चिम बंगालमधील संवेदनशील बूथची यादी निवडणूक आयोगाने मागवली आहे. तसेच…

Read More

२०२२ चा चित्रपती व्ही.शांताराम योगदान पुरस्कार दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना प्रदान

मुंबई, दि. २३ ( वास्तव पोस्ट न्यूज )– ५७ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार तसेच महाराष्ट्र भूषण पुरस्कारासहीत सांस्कृतिक कार्य विभागाकडून कला क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कलावंतांना देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांचा वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील उपस्थित होते. यावेळी मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना…

Read More

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

मुंबई, दि.२३ ( वास्तव पोस्ट न्यूज )– महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दि.२३ शुक्रवार रोजी पहाटे ३ वाजून २ मिनिटांनी निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. मनोहर जोशी यांना २१ फेब्रुवारी रोजी अस्वस्थ वाटत होते. त्यानंतर त्यांना तातडीने मुंबईतील हिंदुजा रुग्णालय दाखल करण्यात आले होते. हृद्यविकाराचा झटका आल्याने…

Read More
error: Content is protected !!