जळगाव जिल्हा महसूल विभाग कार्यालयाच्या अथेलेटिक्स स्पर्धा संपन्न

जळगाव दि .२७ ( प्रतिनिधी )- जिल्हा महसूल विभागाच्या अथेलेटिक्स स्पर्धा आज जिल्हा क्रीडा संकुल जळगाव येथे उत्साहात संपन्न झाल्या स्पर्धेत १०० मीटर, २०० मीटर, ४०० मीटर, रिले, जलद चालणे , गोळाफेक, थाळीफेक, भालाफेक, लांबउडी, उंचउडी या क्रीडा प्रकारचा समावेश होता स्पर्धा पुरुष व महिला वयोगटात घेण्यात आली यातील विजयी स्पर्धकांची निवड विभागीय स्पर्धेसाठी करण्यात…

Read More

अशोक जैन यांचे हस्ते लुपिन डायग्नोसिस लॅबचे उद्घाटन.

आता रिपोर्टसाठी नमुने नाशिक मुंबई पाठवण्याची आवश्यकता पडणार नाही… अवघ्या दोन तासात रिपोर्ट्स मिळणार. जळगाव, दि.२७ ( प्रतिनिधी ) – जळगाव शहरात अद्ययावत तंत्रज्ञानयुक्त लुपिन डायग्नोसिस लॅबचे उद्घाटन जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या हस्ते दि २६ जानेवारी २०२४ रोजी करण्यात आले.रुग्णांना आपल्या उपचारासाठी कुठलीही दिरंगाई होऊ नये व त्यांना आपल्या विविध वैद्यकीय चाचण्या…

Read More

व्हाईस ऑफ मिडियाचा दोन दिवसीय केडर कॅम्प संघटनाशिवाय यश मिळणे केवळ अशक्यच – आ.श्रीकांत भारतीय

जळगाव दि .२७ ( प्रतिनिधी ) भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजपर्यंतचा इतिहास व चळवळीचा मागोवा घेतला तर आपल्या देशाच्या डीएनए मध्येच संघटनेच्या पद्धतीनेच यश मिळते,हे रहस्य आहे.संघटन कार्याने रिच आणि स्पीच मिळते म्हणजे आपला प्रभाव दाखवण्याचा वाव असतो असे प्रतिपादन महाराष्ट्र विधानपरिषदेचे आ.श्रीकांत भारतीय यांनी केले.व्हाईस ऑफ मीडिया या पत्रकारांच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या दोन दिवशीय केडर बेस…

Read More

आरक्षण देतांना कोणावरही अन्याय होणार नाही ; न्यायालयाच्या आदेशाशिवाय गुन्हे मागे घेता येणार नाही

नागपूर ( प्रतिनिधी ) दि .२७, मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांच्या १३ मागण्यांपैकी मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेण्याच्या मागणीवर सरसकट गुन्हे मागे घेतले जाणार नाही . असे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दि.२७ रोजी माध्यमांशी बोलताना सांगितले . फडणवीस यांनी सांगितले की, आंदोलनाचे गुन्हे मागे घेतले जाणार आहेत. मात्र घरे जाळणे, थेट…

Read More

विशेष नवजात शिशु काळजी कक्षाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

नवजात बाळांची वैद्यकीय काळजी सक्षमपणे घेतली जाईल- पालकमंत्री गुलाबराव पाटील जळगाव ( प्रतिनिधी ) दि .२६ -ज‍िल्हा सामान्य रूग्णालयातील वार्ड क्रमांक ६ मधील व‍िशेष नवजात श‍िशु काळजी कक्षाचे (Special Newborn Care Unit- SNCU) पालकमंत्रीगुलाबराव पाटील यांच्या हस्ते आज लोकार्पण झाले. एसएनसीयू युनिटच्या माध्यमातून ज‍िल्ह्यातील नवजात बाळांची वैद्यकीय काळजी सक्षमपणे घेतली जाईल. अशा व‍िश्वास पालकमंत्र्यांनी यावेळी…

Read More

शंकरबाबा पापळकर यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर

मुंबई ( प्रतिनिधी ) दि.२६, बालगृहाच्या माध्यमातून दिव्यांग आणि अनाथ मुलांचे आधारवड असलेले समाजकार्य करणारे ज्येष्ठ समाजसेवक शंकर बाबा पुंडलीकराव पापळकर यांना सामाजिक कार्यासाठी दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. पापळकर यांनी अनेक बालकांच्या जीवनाला आधार देत योग्य दिशा देण्याचे महत्वाचे कार्य केले आहे.देशाच्या नागरी पुरस्कारातील मानाचे पद्म पुरस्कार जाहीर झालेल्या मान्यवरांचे मुख्यमंत्री…

Read More

मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते ध्वजारोहण

मुंबई, ( प्रतिनिधी ) दि.२६: मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य ध्वजारोहण कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी आमदार झिशानबाबा सिद्दिकी, स्वातंत्र्य सैनिक, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, अप्पर जिल्हाधिकारी मनोज गुहाड, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष बागुल, उपजिल्हाधिकारी संदीप निचीत, अंजली भोसले, तेजस…

Read More

स्वत:मधील देशभक्त जागविण्याचा संकल्प करूया – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर, ( प्रतिनिधि ) दि.२६ : भारतीय संविधानाचे अमृत महोत्सवी वर्ष आजपासून सुरू झाले आहे. संविधानाने आपल्याचा जसे अधिकार दिले, तसेच कर्तव्य आणि दायित्वाचीसुध्दा जाणीव करून दिली आहे. या देशासाठी प्राणाची आहुती देऊन स्वातंत्र्याचा मंगलकलश ज्यांनी आपल्या हाती दिला आहे, त्या शहिदांचे स्मरण करून देशाला व लोकशाहीला पुढे नेण्यासाठी स्वत:मधील देशभक्त जागविण्याचा संकल्प करूया, असे…

Read More

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जगातील सर्वात उंच पुतळ्याचे अनावरण ;

विजयवाडा ( प्रतिनिधी ): आंध्र प्रदेशमधील विजयवाडा येथे घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जगातील सर्वात मोठ्या पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या हस्ते करण्यात आले.आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगमोहन रेड्डी यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे अनावरण केले. विजयवाडा येथे उभारण्यात आलेला हा डॉ.आंबेडकरांचा जगातील सर्वात उंच असा पुतळा आहे. या पुतळ्याची उंची सुमारे २०६ फुट इतकी…

Read More

कजगाव येथे महाप्रसाद वाटप

कजगाव ( प्रतिनिधि ) कजगाव येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात श्री शाकंभरी देवी नवरात्र निमित्त ६४ प्रकारच्या फळभाज्यांचा नैवेद्य दाखवण्यात आला. हा नेवैद्य अन्नपूर्णा माता आई भगवती श्री शाकंभरी देवीला अर्पण करण्यात आला. गावातील सर्व सेवेकरी यांनी हा नैवेद्य दाखवला. तसेच प्रसाद म्हणून या नैवेद्याचे वाटप करण्यात आले.

Read More

प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचा आयुष्यातील अविस्मरणीय क्षण-अशोक जैन

जळगाव, दि.२५ (प्रतिनिधी)- “भारतीयांचे श्रद्धास्थान असलेल्या प्रभू रामचंद्र यांच्या अयोध्या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थिती देण्याची संधी मिळणे हा आयुष्यातील अविस्मरणीय क्षण होय !” तसेच महाराष्ट्रातील ही आमची बत्तीसावी पिढी. आमचा ८८० वर्षांचा इतिहास उपलब्ध असून महाराष्ट्रात येवून १२८ वर्ष झाली. आमच्या घर-घराण्याला धार्मिक आणि आध्यात्मिक कार्याची परंपरा आहे. आमचे जे पूर्वज आमच्या सोबत नाहीत त्या…

Read More

प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्ली आरडीसी परेडमध्ये अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलची मयुरी महाले

जळगाव दि. २५ ( प्रतिनीधी ) : येथील अनुभूती इंग्लीश मिडीअम स्कूलची इयत्ता ९ वी ची विद्यार्थीनीची एनसीसी च्या आरडीसी परेडसाठी निवड झाली आहे. दिल्ली येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या आरडीसी परेडच्या सांस्कृतिक कार्यक्रमात नृत्य प्रकारात जिल्ह्यातून मयूरी महाले ही एकमेव आहे. ती दिल्लीला रवाना झाली असून आपल्या जिल्हावासीयांसाठी ही गौरवाची बाब आहे.श्रद्धेय भवरलालजी जैन यांच्या…

Read More

१० वी १२ वी च्या विद्यार्थ्यांना लेखी परिक्षेसाठी अधिक वेळ मिळणार

मुंबई ( प्रतिनिधी ) : दि २४ , राज्यातील दहावी आणि बारावीच्या बोर्डाची परीक्षा पुढच्या आठवड्यापासून सुरु होत आहे. या परीक्षेतील प्रत्येक पेपरच्या निर्धारित वेळेनंतर विद्यार्थ्यांना १० मिनिटं अधिकची मिळणार आहेत. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेत पालक आणि शिक्षकांच्या मागणीनंतर महाराष्ट्र शिक्षण बोर्डाने हा निर्णय घेतला . दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेत पेपर सुरु होण्यापूर्वी १०…

Read More

समतोल प्रकल्पा तर्फे ” राष्ट्रीय बालिका दिवस ” साजरा

जळगाव ( प्रतिनिधि ) केशवस्मृती प्रतिष्ठान संचलित समतोल प्रकल्पा तर्फे आज २४ रोजी गवळी वाडा , जळगाव या ठिकाणी राष्ट्रीय बालिका दिवस साजरा करण्यात आला.मुलींचे अधिकार ,हक्क , त्यांना मिळणाऱ्या संधीचे सोन व्हावे त्यांची ताकद व क्षमता वाढावी. देशातील मुलींना भेडसावणाऱ्या सर्व असमानता बद्दल लोकांमध्ये जनजागृती व्हावी , हा हेतू डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रीय बालिका दिवस…

Read More

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह मंत्रिमंडळ ५ फेब्रुवारीला अयोध्या दौऱ्यावर

मुंबई ( प्रतिनिधि ) दि.२४ , लोकसभा निवडणुकीचा धुमाकुळ तसेच आचारसंहिता लागण्याआधी भाजप आणि मित्रपक्ष प्रणीत सत्ता असलेले सर्व मुख्यमंत्री आपल्या मंत्रिमंडळासह अयोध्येला जाणार आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि संपूर्ण मंत्रिमंडळ ५ फेब्रुवारीला अयोध्या वारी करणार असल्याचे समजते. याबाबत एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी भाष्य केले होते. अयोध्येतील मंदिरात दि २२ रोजी…

Read More
error: Content is protected !!