Home » Archives for 2024-01-20

म्हसवे शिवारातील राजस्थानी हॉटेलच्या मागील भागात ओमनीमध्ये गॅस भरताना सिलिंडरचा स्फोट .

पारोळा (प्रतिनिधी) : दि . २०, पारोळा तालुक्यातील म्हसवे शिवारातील राजस्थानी हॉटेलच्या मागील भागात ओमनीमध्ये गॅस भरताना सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना दि. १९ रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीत हानी झाली नाही. म्हसवे शिवारातील राजस्थानी हॉटेलच्या मागे रात्री ९.३० वाजेच्या सुमारास ओमनी गाडीमध्ये गॅस भरताना गॅस टाकीने अचानक पेट घेतला….

Read More

मुंबई ( प्रतिनिधि ) दि .२० विद्यापीठाच्या १४ परीक्षा पुढे ढकलल्या , २२ जानेवारीच्या परीक्षा ३१ जानेवारीला होणार .

महाराष्ट्र शासनाने अयोध्येतील रामलल्लाच्या प्रतीष्ठापना सोहळ्यानिमित्त सोमवार, २२ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे मुंबई विद्यापीठाच्या १४ परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत . आता या परीक्षा बुधवार, ३१ जानेवारी २०२४ रोजी घेण्याचा निर्णय परीक्षा व मूल्यमापन मंडळाने घेतला आहे. याबाबतचे परिपत्रकही विद्यापीठाने जारी केले आहे. मुंबई विद्यापीठाच्या सकाळच्या सत्रातील बी.कॉम. सत्र ५ ,…

Read More

मराठी साहित्य संमेलनपूर्व सांस्कृतिक कार्यक्रमांची २९ पासून मेजवानी .

अमळनेर (प्रतिनिधि ) : दि .२० , साने गुरुजी साहित्य नगरी अमळनेर येथे ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दि. २, ३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी अमळनेर येथील पू.साने गुरुजी साहित्य नगरी, प्रताप महाविद्यालयात होत आहे. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने २९ जानेवारीपासून संमेलनपूर्व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात कथ्थक नृत्य, तबला वादन,…

Read More

“अयोध्या कारसेवकांच्या सन्मानाने श्रीराम कथेला सुरुवात .”

जळगाव (प्रतिनिधी) दि.२० शहरातील शिवतीर्थ मैदानावर “ जेष्ठ कारसेवक वय वर्ष ९४ श्रीमती. सुलोचनाताई इखे व श्री. दिपकजी घाणेकर यांच्यासह ६० कारसेवकांचे हृदयस्पर्शी सन्मान ”अयोध्यानगरीत श्रीराम मंदिराचा ऐतिहासिक प्राणप्रतिष्ठा सोहळा २२ जानेवारी रोजी होत आहे. या पार्श्वभूमींवर शिवतीर्थ मैदान येथे आज दि. २० ते २४ जानेवारी पर्यंत ह.भ.प. दादा महाराज जोशी यांचे श्रीराम कथेचे आयोजन…

Read More

प्रभू श्रीरामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त जैन इरिगेशनतर्फे चौक, उद्यानांमध्ये सजावट व रोषणाई.भाविकांना केळी तर सहकाऱ्यांना होणार पेढे वाटप.

जळगाव दि. २० प्रतिनिधी – अयोध्याला होत असलेल्या प्रभू श्रीरामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त संपूर्ण भारतात आनंदोत्सव साजरा होत आहे. यापार्श्वभूमीवर भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. कंपनीतर्फे जळगाव शहरातील चार चौक व तीन उद्यानांमध्ये प्रभु श्रीरामांचे प्रतिमांसह आकर्षक सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात येत आहे. प्रभू श्रीरामचंद्र यांच्याविषयी विशेष सजावट लालबहाद्दुर शास्त्री…

Read More
error: Content is protected !!