मुंबई ( वास्तव पोस्ट ) : राज्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी २८८ मतदारसंघात ७ हजार ७८ उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र वैध ठरले होते. त्यातील आज दि. ४ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत २ हजार ९३८ उमेदवारांनी माघार घेतल्याने आता राज्यात ४ हजार १४० उमेदवार अंतिमत: निवडणूक रिंगणात आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.
राज्यातील सर्व २८८ विधानसभा मतदार संघात एकाच टप्प्यात दि. २० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार असून दि. २३ नोव्हेंबर २०२४ रोजी मतमोजणी होणार आहे.
