Headlines
Home » क्रीडा » केंद्रीय युवा कार्य व क्रिडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी घेतली ऑलम्पिक विजेती मनु ची भेट

केंद्रीय युवा कार्य व क्रिडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी घेतली ऑलम्पिक विजेती मनु ची भेट

Olympics 2024 : ऑलिम्पिक मध्ये मनु भाकरने नेमबाजीत २ ब्राँझ पदकं जिंकून भारताची मान उंचावली आहे. तिच्या यशामुळे संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण आहे. तिचे केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी ट्विट करून अभिनंदन केले आहे.

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : केंद्रीय युवा कार्य व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी पॅरिस ऑलिम्पिक मध्ये भारतासाठी नेमबाजीत दोन कांस्य पदक जिंकणाऱ्या मनू भाकर आणि तिच्या कुटुंबाची भेट घेत त्यांचे अभिनंदन केले.

रक्षा खडसे यांनी अभिनंदन केलेल्या ट्विटला मनू भाकरने रिट्विट करून आभार व्यक्त केले आहेत. रक्षा खडसे या ट्विटमध्ये लिहितात की, मनू भाकरने अभूतपूर्व कामगिरी केली. तिने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी नेमबाजीत पदक जिंकणारी पहिली महिला बनून उल्लेखनीय कामगिरीसह भारताचे पदक खाते उघडले.

दरम्यान केंद्रीय युवा कार्य व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि मनु भाकर यांच्यात झालेली बैठक अत्यंत फलदायी ठरल्याचे मनुने म्हटले आहे. पॅरिसमधील माझ्या अनुभवाबद्दल आम्ही खूप बोललो आणि भारतातील शूटिंग खेळाच्या उज्ज्वल भविष्याबद्दल देखील चर्चा करणे प्रोत्साहनदायक होते, असे आपल्या X या सामाजिक माध्यमातून पोस्ट करत मनु भाकरने सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!