नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट ) : रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी २७० इलेक्टोरल मतांचा बहुमताचा आकडा पार केला असून आता ते अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदावर विराजमान होणार आहेत. ट्रंप हे ४७ वे राष्ट्राध्यक्ष असतील. याआधी ट्रंप हे दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष पदाची जबाबदारी घेतील. प्रतिस्पर्धी डेमोक्रॅट पक्षाच्या कमला हॅरिस यांचा त्यांनी पराभव केला.
ट्रम्प यांनी २७० हा बहुमताचा आकडा पार केल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाची घोषणा अमेरिकन माध्यमांनी करताच अमेरिकेसह जगभरातील ट्रम्प समर्थकांमध्ये आनंदाची लाट उसळली. अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुका २०२४ मतदानानंतरचे ट्रेंड बहुमत मिळाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी फ्लोरिडामध्ये एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले आणि या महान विजयाबद्दल अमेरिकेतील जनतेचे आभार मानले.
फ्लोरिडातील या मोठ्या कार्यक्रमात डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन जनतेला मोठी आश्वासने दिली. हा विजय अमेरिकन जनतेचा, अमेरिकेतील प्रत्येक नागरिकाचा विजय असल्याचे ट्रंप यांनी यावेळी सांगितले. या विजयाबद्दल त्यांनी अमेरिकन जनतेचे आभारही मानले.
ट्रम्प म्हणाले की, माझा प्रत्येक श्वास अमेरिकेसाठी आहे. मी तुमच्या भविष्यासाठी लढेन. ट्रंप पुढे म्हणाले की, आम्हाला स्विंग राज्यांचा पाठिंबा मिळाला. तिथल्या लोकांनी आमच्यावर प्रेम केले. हा अमेरिकनांचा विजय आहे. पुढील चार वर्षे अमेरिकेसाठी सोनेरी असणार आहेत, असेही डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. सिनेटमधील विजय अविश्वसनीय आहे. अमेरिकेत पहिल्यांदाच ऐतिहासिक बदल झाला आहे. अमेरिकेच्या इतिहासातील हा सर्वात नेत्रदीपक विजय आहे. या विजयाबद्दल ट्रम्प यांनी पत्नी मेलानिया ट्रम्प यांचेही आभार मानले आहेत.
ट्रम्प म्हणाले की आम्ही सिनेटवर पुन्हा नियंत्रण मिळवले आहे, आमच्यासाठी इतका पाठिंबा आहे, मी याआधी असे दृश्य पाहिले नाही. आम्ही आमची सीमा मजबूत करू, असे ट्रम्प म्हणाले. आपल्या भाषणात त्यांनी कमला हॅरिस यांचे अभिनंदन केले. या निवडणुकीत डेमोक्रॅट पक्षाच्या कामगिरीबद्दल आपण उपाध्यक्ष कमला हॅरिस यांचे अभिनंदन करतो, असे ते म्हणाले.
इलॉन मस्कचे तोंडभरून कौतुक केले. डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या भाषणात समर्थक आणि टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांचे नाव घेत डोनाल्ड ट्रम्प यांनीही या विजयासाठी त्यांचे अभिनंदन केले. तसेच निवडणूक प्रचारात दिलेल्या महत्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांचे आभार मानले.