PUNE BUS RAPE : पुण्यात बस आगारामध्ये एका शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीची ओळख पटवली असून त्याला पकडण्यासाठी वेगवेगळ्या दिशेने पथके रवाना झाली आहेत.
पुणे ( वास्तव पोस्ट ) : पुण्यात आज एक लज्जास्पद घटना समोर आली आहे. येथे बस आगारामध्ये उभ्या केलेल्या बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी आरोपीचे नावही उघड केले असून त्याला पकडण्याचा प्रयत्न सुरु आहेत. तक्रारीनुसार, पीडिता सकाळी बस पकडण्यासाठी वाट पाहत असताना तिच्यासोबत ही घटना घडली.

पोलिसांनी सांगितले संपूर्ण प्रकरण
पुणे पोलिसांनी मुलीवरील बलात्काराच्या घटनेची माहिती माध्यमांना दिली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, “एक काम करणारी तरुणी तिच्या घरी परत जाण्यासाठी बसची वाट पाहत होती. यादरम्यान, एक पुरूष आला आणि महिलेला म्हणाला की तिच्या घरी जाणारी बस दुसरीकडे कुठेतरी उभी आहे. त्याने महिलेला पार्क केलेल्या बसमध्ये नेले. तिला बस मध्ये जायला सांगून तिच्या मागे तो देखील त्या बसमध्ये चढला आणि नंतर तिच्यावर बलात्कार केला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, पीडितेची प्रकृती सध्या स्थिर आहे.
सीसी टीव्ही फुटेजमध्ये संशयित आरोपीची ओळख पटली

बस स्थानकात असलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या साह्याने बलात्कार करणाऱ्या संशयित आरोपीची ओळख पटली असून आरोपीने गैरकृत्य केल्यानंतर तो बस मधुन खाली उतर तां ना दिसून येत आहे. काही क्षणातच पीडित तरुणी देखील खाली उतरल्याचे दिसते. संशयित आरोपीचे नाव दत्तात्रय रामदास गाडे असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आहे. पीटीआयने वृत्त दिले आहे की पोलिसांनी सांगितले की आरोपीचा गुन्हेगारी रेकॉर्ड आहे. स्वारगेट पोलिस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, संशयित आरोपीवर आधीच चोरी आणि चेन स्नॅचिंगचे गुन्हे दाखल आहेत.
आरोपीच्या शोधार्थ पोलिस पथकं रवाना
पुणे पोलिसांनी सांगितले की, २६ वर्षीय तरुणीवर झालेल्या कथित बलात्कार प्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटवण्यात आली आहे. आरोपी अजूनही फरार असून त्याला पकडण्यासाठी पोलिस पथके तयार करण्यात आली आहेत.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी दखल घेतली
पुण्यातील स्वारगेट येथे बसमध्ये झालेल्या बलात्काराच्या घटनेबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे आयुक्तांशी चर्चा केली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणी कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. घटनेचे गांभीर्य पाहून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनीही पोलिसांना या प्रकरणाचा योग्य तपास करून अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.
