मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : विधान परिषदेच्या शिक्षक, तसेच पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत अर्ज माघारीचा आज शेवटचा दिवस आहे. कोकण पदवीधर निवडणुकीतून शिवसेना उद्धव ठाकरे गटाने माघार घेत काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केल्याची मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ही माहिती दिली आहे.
याबाबत माध्यमांसमोर बोलतांना संजय राऊत म्हणाले की, “कोकण पदवीधरची जागा ही काँग्रेसला मिळत आहे. काल रात्री आमची याबाबत चर्चा झाली. त्यात नाना पटोले देखील सहभागी होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार किशोर जैन यांची उमेदवारी आम्ही मागे घेतली आहे”.
तसेच मुंबईचा पदवीधर मतदार संघ मागच्या ४० वर्षे वर्षांपासून शिवसेना जिंकतं आली आहे, ती आमची परंपरागत जागा आहे. मुंबईतला पदवीधर मतदारसंघ हा शिवसेनेचाच आहे तसेच नाशिक पदवीधर मतदारसंघ आमची सेटिंग जागा आहे, असे म्हणत या जागेवर फार चर्चा करून उमेदवारी द्यायची गरज नव्हती, असेही संजय राऊत म्हणाले.
दरम्यान विधानसभेसाठी मविआ सोबतच लढनार असुन लोकसभा निवडणुकीत १५८ जागांचा कौल जरी आमच्या बाजूने दिसत असला तरी आम्हाला विधानसभा निवडणुकीत सावधगिरीने पावले उचलावी लागतील. आम्ही १८० ते १८५ जागा जिंकू, असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला. कुठल्याही परिस्थितीत महाविकास आघाडीचे सरकारी येईल, असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.
