जामनगर | दि.०२ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी सध्या त्यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनमध्ये व्यस्त आहे. गुजरातमधील जामनगरमध्ये विविध कार्यक्रम सोहळे सुरू आहेत. अनंत या वर्षी जुलै महिन्यात राधिका मर्चंट हिच्यासोबत लग्न करणार आहे. याआधी दोघांचे ग्रँड प्री-वेडिंग सेलिब्रेशन सुरू आहे.
दरम्यान या प्री वेडिंग सोहळ्याच्या पहिल्या दिवशी अनेक व्हीव्हीआयपी पाहुण्यांचे आगमन झाले. याप्रसंगी सेलिब्रेशनची सुरुवात करतांना मुकेश अंबानी म्हणाले, ‘अनंत मध्ये असीम शक्ती आहे, संस्कृतमध्ये अनंत म्हणजे ज्याला अंत नाही. मी जेव्हाही अनंतकडे पाहतो तेव्हा मला त्यात माझे वडील धीरूभाई अंबानी यांची झलक दिसते. अनंतची वृत्ती अगदी माझ्या वडिलांसारखी आहे. त्यांच्यासाठी काहीही अशक्य नाही. जेव्हा मी ते पाहतो तेव्हा मला माझे वडील धीरूभाई अंबानी दिसतात.’
मुकेश अंबानी पुढे म्हणाले की, ‘जामनगर हे माझ्या वडिलांचे आणि माझे कामाचे ठिकाण आहे. ही अशी जागा आहे जिथे आम्हाला आमचे ध्येय आणि आवड मिळाली. मी ३० वर्षांपूर्वी जामनगरला पाहतो तेव्हा इथे नापीक जमिनी होत्या पण आज आपण जे पाहतोय ते धीरूभाई अंबानींच्या स्वप्नाची पूर्तता आहे. आज जामनगर वेगळ्या दिशेने वाटचाल करत आहे.
