मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : महाराष्ट्रातील कर्तव्यदक्ष आणि धडाकेबाज प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली करण्यात आली आहे. दुग्धविकास आणि पशुसंवर्धन खात्याच्या सचिवपदावरुन आता त्यांची विकास आयुक्त, असंघटित कामगार विभागाचे विकास आयुक्त या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. अप्पर मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी यासंबंधीच पत्र काढले.
तुकाराम मुंढेंनी सोलापूरचे उपजिल्हाधिकारी म्हणून ऑगस्ट २००५ मध्ये आपल्या प्रशासकीय कारकिर्दीला सुरवात केली होती. तर सातत्याने बदली होणारे अधिकारी म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आली. तुकाराम मुंडे यांची १९ वर्षांच्या कारकीर्दितील ही २२ वी बदली आहे.
तुकाराम मुंढे एक शिस्तप्रिय अधिकारी आहेत. एक प्रामाणिक अधिकारी म्हणून त्यांनी स्वत:ची ओळख निर्माण केलीय. त्यांच्या या प्रामाणिकपणामुळेच त्यांना बदल्यांना सामोरे जावे लागल्याचे बोलले जाते.
