Home » राष्ट्रीय » अहमदाबादमधील ३ शाळांना बॉम्बने उडवून देण्याची इमेलद्वारे धमकी; पोलिस यंत्रणा सतर्क

अहमदाबादमधील ३ शाळांना बॉम्बने उडवून देण्याची इमेलद्वारे धमकी; पोलिस यंत्रणा सतर्क

अहमदाबाद | दि.६ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – दिल्लीनंतर आता अहमदाबादच्या तीन शाळांना ईमेलद्वारे बॉम्ब ब्लास्टची धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच दिल्लीतील काही शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. देशात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर ईमेलद्वारे मिळणाऱ्या या धमकींमुळे पोलिस यंत्रणा मात्र अलर्ट मोड आहे.

अहमदाबाद पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. गुजरातमध्ये लोकसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरू असताना, शाळेत बॉम्बची धमकी मिळाल्याने पोलीस सतर्क झाले आहेत. गुजरातमध्ये उद्या तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. अहमदाबादमधील विविध शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आलेल्या मेलची चौकशी करत आहेत. यात परदेशी डोमेनचा वापर करण्यात आला असुन रशियन मेल आयडीवरून हा ईमेल करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अहमदाबादच्या शाळांमध्ये आतापर्यंत काहीही संशयास्पद आढळले नाही. परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून घाबरण्याचे कारण नाही. अनेक शाळांमध्ये शोधमोहीम पूर्ण झाली असुन पोलीस सतर्कतेने काम करत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!