देशभरातील कोट्यावधी शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून गिफ्ट ! DAP चे दर वाढनार नाही

नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट ) : नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मोठी भेट दिली आहे. डीएपीच्या दरात कोणतीही वाढ होणार नसून ५० किलोची पिशवी १३५० रुपयांना मिळत राहणार आहे. तसेच शेतकऱ्यांच्या गरजेनुसार प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पीक…

Read More

केरळ चे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी केला नितेश राणे यांच्या वक्तव्याचा निषेध !

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : भारतीय जनता पक्षाचे नेते तथा महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी केरळ राज्याचा “मिनी पाकिस्तान” असा उल्लेख केल्याबद्दल सत्ताधारी आघाडी आणि विरोधकांची टीका केली आहे. केरळ हे मिनी पाकिस्तान आहे म्हणून राहुल गांधींची बहीण तिथे निवडून आली, सगळे अतिरेकी त्यांना मतदान करतात. अतिरेकी लोकांना धरूनच हे लोक…

Read More

इस्रोच्या ‘स्पॅडेक्स PSLV-C60’ यशस्वी मोहिमेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कौतुक

नवीन वर्षाच्या पूर्वसंधेला भारतीयांना अप्रतिम वैज्ञानिक भेट मुंबई ( वास्तव पोस्ट ) : नूतन वर्षाच्या पूर्वसंध्येला भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) भारतीयांना अप्रतिम वैज्ञानिक भेट दिली आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारताच्या ‘स्पॅडेक्स PSLV-C60’ या महत्वाकांक्षी मोहिमेच्या यशाचे कौतुक करत या संशोधन प्रकल्पात सहभागी इस्रोच्या वैज्ञानिक, अभियंते यांचे अभिनंदन केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र…

Read More

नोकरीसाठी केलेल्या अर्जावर १८% जीएसटी लागणार ! सरकार तरुणांच्या जखमेवर मीठ चोळतेय : खा. प्रियंका गांधी वाड्रा

नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट ) : देशात बेरोजगारांची संख्या वाढतच चालली असून बेरोजगार जास्त आहे आणि त्यामानाने नोकऱ्या कमी आहेत. यामुळे तरुणांना आपल्या प्रतिभा किंवा कौशल्य दाखवण्याची संधी मिळत नाही. एका पदासाठी नोकरीची जाहिरात प्रसिद्ध केली तरी हजारो अर्ज येतात. या स्पर्धात्मक युगात सरकारी नोकरी ही तरुणांची पहिली पसंती आहे. दरम्यान बेरोजगारांना नोकऱ्या देण्यासाठी…

Read More

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्ली येथे घेतली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट

नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट ) : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची ७ लोक कल्याण मार्ग येथील त्यांच्या शासकीय निवासस्थानी सहकुटुंबीय सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान मुलगा लोकसभा खासदार डॉ.श्रीकांत शिंदे आणि स्नुषा वृषाली शिंदे उपस्थित होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रधानमंत्री यांना पारंपारिक पैठणी शाल आणि पुष्पगुच्छ…

Read More

माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचे निधन

नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट ) : भारताचे दिग्गज माजी पंतप्रधान, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन झालं आहे. मनमोहन सिंह यांनी वयाच्या ९२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांची आज अचानक प्रकृती बिघडल्याने दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारादरम्यान त्यांचेनिधन झाले त्यांच्या निधनामुळे काँग्रेससह संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. त्यांना…

Read More

सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यु नसून मर्डर आहे ; परभणी भेटीत राहून गांधी यांचा गंभीर आरोप !

PARBHANI VIOLENCE : सोमनाथ सूर्यवंशी दलित आहे. ते संविधानाचे संरक्षण करत होते. त्यामुळे त्यांना मारण्यात आले. म्हणून या घटनेला मी त्यांचा खून असे म्हणेल. मुख्यमंत्री तसेच विचारधारा या घटनेस जबाबदार असल्याचे सांगत राज्य सरकारवर राहुल गांधी यांनी टिका केली. परभणी ( वास्तव पोस्ट ) : लोकसभेतील विरोधी पक्षनेते तथा काँग्रेसचे नेते राहुल गांधी आज दि.२३…

Read More

सचिनच्या एका पोस्टने १२ वर्षीय सुशीला मीनाचं नशीब उजाळले ! राजस्थानचे कृषी मंत्री मदतीला धावले

प्रतापगड ( वास्तव पोस्ट ) : राजस्थानच्या प्रतापगड जिल्ह्यातील १२ वर्षांची मुलगी तिच्या गोलंदाजीच्या ॲक्शनमुळे प्रचंड चर्चेत आली आहे. क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणारा महान फलंदाज सचिन तेंडुलकर याने या मुलीचा व्हिडीओ एक्स या सोशल मीडियावर पोस्ट केला होता, तेव्हापासून सुशीला मीना नामक चिमुकलीचे नशीब पालटले आहे. सचिन तेंडुलकरही सुशीला मीनाची बॉलिंग ॲक्शन पाहून प्रभावित…

Read More

अमित शाह यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे देशभरात तीव्र पडसाद ; विरोधी पक्षाकडून माफी आणि राजीनाम्याची मागणी

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल संसदेत केलेल्या वक्तव्यावरून महाविकास आघाडीचे नेते आक्रमक झाले आहेत. संविधानामुळेच अमित शाह हे गृहमंत्री झाल्याचा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लगावला.”भाजपा पक्ष आणि उर्मट नेते हे महापुरुषांचा अपमान करत आहेत. अमित शाहांकडून बाबासाहेबांचा हिणकस आणि उद्दाम प्रकारे उल्लेख करण्यात…

Read More

‘विंदांचे गद्यरुप’ या समीक्षात्मक पुस्तकासाठी डॉ.सुधीर रसाळ यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर

नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट ) : मराठीतील सुप्रसिद्ध समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांना ‘विंदांचे गद्यरुप’ या समीक्षात्क पुस्तकासाठी मराठी भाषेकरिता साहित्य अकादमी पुरस्कार आज जाहीर करण्यात आला. अकादमीचे सचिव, के. श्रीनिवासराव यांनी साहित्य अकादमी पुरस्कारांची घोषणा केली. देशातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च संस्था म्हणून नावलौकिक असणाऱ्या साहित्य अकादमीने, येथील कोपर्निकस मार्ग स्थित साहित्य अकादमीच्या रविंद्र…

Read More

‘पुष्पा-२’ चित्रपटाचा अभिनेता अल्लू अर्जुन यास अटक !

हैद्राबाद ( वास्तव पोस्ट ) : पुष्पा-2 अभिनेता अल्लू अर्जुनला पोलिसांनी अटक का केली? तेही अशा वेळी जेव्हा पुष्पा-2 बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने कमाईचे सर्व रेकॉर्ड तोडले आहे. या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात १००० कोटींची कमाई केली आहे. अशा परिस्थितीत अल्लू अर्जुनला अचानक अटक झाल्याने सर्वच चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. सोशल मीडियावर एक…

Read More

शरद पवार आणि राहुल गांधी मारकडवाडी येथे देणार भेट; ईव्हीएम विरोधात लाँग मार्चची तयारी !

नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट ) : जेष्ठ नेते शरद पवार आणि राहुल गांधी मारकडवाडीत ईव्हीएम विरोधातील आंदोलनाला गती देण्यासाठी ८ डिसेंबर रोजी मारकडवाडीला भेट देतील, तर राहुल गांधी तिथून ईव्हीएम विरोधी मोर्चा काढतील. पदाधिकारी व अनेक गावकऱ्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केल्याने माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी गावात बॅलेट पेपरद्वारे चाचणी मतदान घेण्याचा वाद अधिकच चिघळला आहे….

Read More

महाराष्ट्राच्या ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाचा आंतरराष्ट्रीय गौरव ; प्रतिष्ठेचा ‘स्कॉच पुरस्कार’ प्रदान

नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट ) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या संकल्पनेतून राबविलेल्या “शासन आपल्या दारी” या उपक्रमाला प्रतिष्ठीत स्कॉच पुरस्कार आज प्रदान करण्यात आला. देशभरातील विविध श्रेणीतील २८० प्रकल्पांमधून “शासन आपल्या दारी” ची निवड करण्यात आली. शासनाच्या विविध योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या माणसापर्यत पोहोचवून त्याचे जीवन सुखकर करण्यासाठी हा उपक्रम मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाने…

Read More

नायजेरियाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘द ग्रँड कमिशनर ऑफ द ऑर्डर ऑफ नायजर’ या पुरस्काराने केले सन्मानित

नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट ) : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या तीन देशांच्या दौऱ्यावर गेले आहे. याच दौऱ्यात नायजेरियाला भेट दिल्यावर मोदी हे ब्राझील आणि गयाना या देशांना भेटी देणार आहेत. नायजेरियात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भव्य स्वागत करण्यात आले आहे. त्यांना नायजेरियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘द ग्रँड कमिसर ऑफ द ऑर्डर ऑफ नायजर’ (जीकॉन)ने सन्मानित…

Read More

सरदार पटेल जयंतीनिमित्त स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेकडून पुष्पांजली अर्पण

अहमदाबाद ( वास्तव पोस्ट ) : पंतप्रधान मोदींनी सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त स्टॅच्यू ऑफ़ यूनिटी येथे त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. आज दि.३१ ऑक्टोबर रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांची १४९ वी जयंती आहे. या निमित्ताने केवडिया येथील स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे एकता परेडचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले होते. त्यांनी सरदार…

Read More
error: Content is protected !!