Home » महाराष्ट्र » भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी १५ मार्च पर्यंत मुदतवाढ

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी १५ मार्च पर्यंत मुदतवाढ

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : १० वी १२ वी तसेच त्यानंतरच्या व्यावसायिक, बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये जळगाव शहरातील महाविद्यालया मध्ये प्रवेशित असलेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांसाठी भोजन, निवास, निर्वाह भत्ता तसेच शैक्षणिक भत्ता इत्यादी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु करण्यात आलेली आहे. ही योजना यापुर्वी जिल्हा स्तरावरच लागू करण्यात आली होती. परंतु आता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना तालुकास्तरावर देखील लागू करण्यात आलेली आहे.  विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेचा ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी दि१५ मार्च, २०२५ पर्यंत मुदत वाढ देण्यात आलेली आहे.

सन २०२४-२५ पासून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थाना https://hmas.mahait.org/ या पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. ऑनलाईन पोर्टल हे वसतिगृह प्रवेश प्रक्रिया व स्वाधार योजनेसाठी एकत्रित तयार करण्यात आले असून सर्व प्रथम विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेनुसार शासकीय वसतिगृहास निवड होईल. तसेच पात्र असूनही ज्या विद्यार्थ्यांची गुणवत्ते अभावी शासकीय वसतिगृहात निवड होणार नाही अश्या पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाइन प्रणालीद्वारे स्वाधार योजने करिता ग्राह्य धरले जाणार आहेत.

दि१५ मार्च, २०२५ पर्यंत ऑनलाईन अर्ज भरून ऑफलाईन अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह संबंधित वसतीगृहाचे गृहपाल/ सहायक आयुक्त समाज कल्याण जळगाव येथे सादर करावा, असे आवाहन योगेश पाटील, सहायक आयुक्त समाज कल्याण जळगाव यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!