SANDIP RANDHE

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांवर गुन्हा दाखल; मतदान केंद्रात केली EVM ची पूजा

बारामती दि.८ ( वास्तव पोस्ट न्यूज ) : लोकसभा मतदारसंघात पार पडलेल्या निवडणूक प्रक्रियेत मतदारांनी मोठ्या उत्साहात आपला मतदानाचा हक्क बजावला. मात्र मतदान प्रक्रियेदरम्यान राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. एका मतदान केंद्रावर इव्हीएम मशीनची पूजा केल्याप्रकरणी त्यांच्यावर पुणे येथील सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार,…

Read More

करण पाटील यांच्या प्रचारार्थ जळगावात इंडिया- महाविकास आघाडीची संयुक्त जाहीर सभा संपन्न

जळगाव | दि.८ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार करण पाटील ह्यांच्या प्रचारार्थ जळगाव येथील शिवतीर्थ मैदानावर इंडिया-महाविकास आघाडीची संयुक्त जाहीर सभा पार पडली. सभेसाठी मैदान लोकांनी संपूर्ण भरल्याने बरेच जण मैदानाबाहेर उभे होते. घोषणांनी परिसर दणानुन गेला होता. यावेळी उपस्थित लोकांमध्ये जबरदस्त उत्साह बघायला मिळाला. सुरुवातीला महाविकास…

Read More

केजरीवाल यांच्या अंतरीम जामिनावर आजही निर्णय नाही; पुढील सुनावणी ९ मे रोजी

नवी दिल्ली | दि. ७ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांच्या अंतरीम जामीनावर सर्वोच्च न्यायालयाने आज झालेल्या दीर्घ सुनावणीनंतरही कोणताही निर्णय घेतलेला नाही, या प्रकरणाची पुढील सुनावणी ९ मे रोजी होणार आहे. सध्या लोकसभा २०२४ सार्वत्रिक निवडणूका असल्याने त्यांना अंतरीम जामीन देण्याचा निर्णय होऊ शकतो असे संकेतही कोर्टाने…

Read More

…तर मी अभिनय क्षेत्र सोडणार ! कंगणा राणावतच्या चाहत्यांसाठी दुःखद खबर

मुंबई | दि.६ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतला हिमाचल प्रदेशातील मंडी येथून लोकसभा निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे कंगना सध्या जोरदार प्रचारात व्यस्त आहे. या निवडणुकीत आपला विजय होईल, असा विश्वास तिने व्यक्त केला आहे. दरम्यान, एका वृत्तवाहिनीशी बोलताना कंगणाने अनेक विषयावर भाष्य केले. वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कंगणाला विचारण्यात…

Read More

अहमदाबादमधील ३ शाळांना बॉम्बने उडवून देण्याची इमेलद्वारे धमकी; पोलिस यंत्रणा सतर्क

अहमदाबाद | दि.६ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – दिल्लीनंतर आता अहमदाबादच्या तीन शाळांना ईमेलद्वारे बॉम्ब ब्लास्टची धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच दिल्लीतील काही शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. देशात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर ईमेलद्वारे मिळणाऱ्या या धमकींमुळे पोलिस यंत्रणा मात्र अलर्ट मोड आहे. अहमदाबाद पोलीस या प्रकरणाचा तपास…

Read More

मंत्र्याच्या स्वीय सचिवाच्या घरी ईडीची छापेमारी ;३० कोटीचे घबाड जप्त !

रांची | दि.६ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या उद्या होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या आधीच अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) झारखंडची राजधानी रांचीमध्ये अनके ठिकाणी छापेमारी केली आहे. या छापेमारीत मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्यात आली आहे. ग्रामीण विकास मंत्री आलमगीर आलम यांचे स्वीय सचिव संजीव लाल यांच्या नोकराच्या घरातून ईडीने मोठी रोकड जप्त…

Read More

चारित्र्याच्या संशयावरून चाकूने भोसकून पत्नीची हत्या ; पती फरार

मुंबई | दि.५ ( वास्तव पोस्ट न्यूज) – येथील मलबार हिल परिसरातील शिमला नगर झोपडपट्टी येथे राहणाऱ्या अजय वर्धम (वय ३८) याने पत्नी अंजली (वय ३६) हीची चाकूने भोसकून हत्या केली. या प्रकरणी मलबार हिल पोलीस ठाण्यात मृत अंजली वर्धमच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून या प्रकरणी मलबार हिल पोलिसांनी भारतीय दंड संविधान कलम ३४, ३०२ आणि…

Read More

निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांचेकडून नागरिकांना मतदान निमंत्रण पत्र; मतदान टक्केवारी वाढीसाठी उपक्रम

जळगाव | दि.४ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी एका निमंत्रण पत्राच्या माध्यमातून जिल्ह्यातील नागरिकांना मतदान करण्याचे भावनिक आवाहन केले. आज रोजी पर्यंत जळगाव जिल्ह्यातील २ लाख २० हजार घरापर्यंत तर जळगाव शहरात १लाख ३० हजार घरापर्यंत निमंत्रण पोहचवीण्यात आले. या निमंत्रण पत्रकातील संदेशात…

Read More

तू आडवा येच… तुला गाडूनच पुढे जातो ; कणकवलीत उद्धव ठाकरेंनी शाब्दिक तोफ डागली

चिपळूण | दि.४ ( वास्तव पोस्ट न्यूज) – रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आलेला आहे. लोकसभा २०२४ च्या निवडणुकीत राऊत यांना विजयाची हॅट्ट्रिक करण्याची संधी आहे. जर असे झाले तर महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या पराभवाची हॅट्ट्रिक होणार आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून विनायक राऊत दोनवेळा विजयी झाले आहेत. इकडे नारायण…

Read More

अखेर IPL 2024 मधून मुंबई इंडियन्सचे आव्हान संपुष्टात; प्ले ऑफच्या शर्यतीमधून बाहेर

मुंबई | दि.३ ( वास्तव पोस्ट न्यूज )– मुंबई इंडियन्स आपल्या घरच्या मैदानात केकेआर कडून २५ धावांनी पराभूत झाल्याने ते प्ले ऑफच्या शर्यतीमधून बाहेर पडले. वेंकटेश अय्यरच्या ७० धावांच्या खेळीच्या जोरावर केकेआरने विजयासाठी १७० धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र मुंबई इंडियन्सचा डाव १८.५ षटकात १४५ धावांवर आटोपला. मुंबईसाठी हे आव्हान मोठे नसले तरी मुंबईच्या संघाची…

Read More

मेहरूण परिसरात महाविकास आघाडीची भव्य प्रचार फेरी ; नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद

जळगाव | दि.३ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार करण पाटील (पवार) यांचा जळगाव शहरातील प्रभाग क्रमांक १४ व १५ भागात साईबाबा मंदीर मेहरुण येथून प्रचार दौऱ्याचा शुभारंभ केला. याप्रसंगी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून वंदन करण्यात आले. पुढे बिलाल चौक,…

Read More

ठाणे लोकसभा महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांचा उमेदवारी अर्ज दाखल

ठाणे | दि.३ ( वास्तव पोस्ट न्यूज )– लोकसभा मतदारसंघाचे महायुतीतील शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. त्यापूर्वी ठाणे शहरात महायुतीच्या वतीने विराट रॅली काढून महायुतीचे शक्ती प्रदर्शन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित ठाणेकर नागरिकांना संबोधित करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

Read More

शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांना नेण्यासाठी आलेलं हेलिकॉप्टर महाड मध्ये क्रॅश

रायगड | दि.३( वास्तव पोस्ट न्यूज )– शिवसेना ( उद्धव ठाकरे गट ) नेत्या सुषमा अंधारे यांना सभेला नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर लॅंड होतांना रायगड जिल्ह्यातील महाड येथे कोसळले. अपघात झाला त्यावेळी सुषमा अंधारे हेलिकॉप्टरमध्ये नव्हत्या. हेलिकॉप्टरमधील पायलट व सहाय्यक दोघे सुरक्षित आहेत. सविस्तर वृत्त असे की, सुषमा अंधारे यांची काल महाड येथे सभा होती. सभा…

Read More

मतदानाची आकडेवारी अचानक वाढली कशी ? निवडणूक आयोग ‘कारस्थानी राजकारण्या’च्या हातातले बाहुले; संजय राऊत

सांगली | दि.२ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – लोकसभा २०२४ करीता ज्या मतदारसंघात पहिल्या आणि दूसऱ्या टप्प्यात मतदान झाले होते, त्या-त्या मतदार संघात झालेल्या मतदानाची टक्केवारी घोषित करण्यात आली होती. मात्र आता निवडणूक आयोगाने नव्याने पुन्हा मतदानाची टक्केवारी घोषित केली आहे. पहिल्या टप्प्यात झालेल्या मतदानाची टक्केवारी ११ दिवसांनी तर दुसऱ्या टप्प्यात झालेल्या मतदानाची टक्केवारी…

Read More

कोल्हापूरात प्रचंड जनसमुदायाच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची शिवशाहु निर्धार सभा

कोल्हापुर | दि.२ ( वास्तव पोस्ट न्यूज )– लोकसभेतील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार छत्रपती शाहू महाराज शहाजी ह्यांच्या प्रचारार्थ इंडिया- महाविकास आघाडीची संयुक्त सभा कोल्हापुरातील गांधी मैदानात पार पडली. शिवसेना (उद्धव ठाकरे गट) पक्षप्रमुख मा. उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष मा. शरद पवार ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या ह्या सभेस प्रचंड…

Read More
error: Content is protected !!