बीड ( वास्तव पोस्ट ) : मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरुन गेला होता. गेल्या काही दिवसांत अनेक राजकीय नेत्यांनी धनंजय देशमुख आणि कुटुंबीयांची भेट घेतली. आता अभिनेता आमिर खान याने धनंजय देशमुख यांची भेट घेतली. पाणी फाऊंडेशनच्या कार्यक्रमात आमिरने धनंजय यांची भेट घेतली. यावेळी संतोष देशमुख यांचा मुलगा विराज देशमुखसुद्धा उपस्थित होता. यावेळी आमिरची पूर्व पत्नी किरण रावसुद्धा तिथे उपस्थित होती.

आमिर खान माणूस म्हणून संवेदनशील आहे हे पुन्हा एकदा सिध्द झाले. मयत संतोष देशमुख यांच्या लेकराला जवळ घेऊन आमिर ने त्याला आधार दिला. यावेळी गावकऱ्यांना भेटून त्यांच्या सोबत चर्चा केली.
मराठी चित्रपटातील एकही अभिनेता जे करू शकला नाही ते आमिरने करून दाखवले. अभिनेता आमिर खान हा संवेदना आणि दुःख जाणणारा असून त्याने बराच वेळ देशमुख कुटुंबाला दिला. संतोष देशमुख यांच्या मुलास मिठीत घेऊन त्याचे सांत्वन या अभिनेत्याने केले.
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे दि. ९ डिसेंबर २०२४ रोजी अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती.
