Home » राष्ट्रीय » रायगडा रेल्वे स्थानकात मालगाडीवर बसलेल्या व्यक्तीचा विजेच्या तारांना स्पर्श झाल्याने मृत्यू !

रायगडा रेल्वे स्थानकात मालगाडीवर बसलेल्या व्यक्तीचा विजेच्या तारांना स्पर्श झाल्याने मृत्यू !

ओडिशा ( वास्तव पोस्ट ) : रायगडा रेल्वे स्थानकावर एक भीषण अपघात झाला. मालगाडीत बसलेल्या एका व्यक्तीने हाय व्होल्टेजच्या वायरला स्पर्श केला आणि डोळ्याची पापणी पडण्या च्या आताच तो आगीचा गोळा होऊन खाली पडला. संपूर्ण भाजल्याने त्या व्यक्तीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी घडली. समोर आला आहे. यात विजेचा धक्का लागून त्या व्यक्तीला आपला जीव गमवावा लागतांना दिसत आहे. नरसिंग कांडा (वय ५५) असे मृताचे नाव असून तो ओडिशातील नुआपाडा जिल्ह्यातील बदनाला गावचा रहिवासी होता.

मिळालेल्या माहितीनुसार, नरसिंग कांडा कुटुंबासह सिकंदरपूर येथे मजुरीचे काम करण्यासाठी गेले होते. तब्येत बिघडल्याने तो घरी परत जात होता. सकाळी १० वाजण्याच्या सुमारास नरसिंग प्लॅटफॉर्म क्रमांक ५ वर मालगाडीच्या बोगीत चढण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी काही लोकांनी त्याला हटकले सुद्धा होते. नरसिंग मालगाडीच्या उघड्या बोगीवर चढत असताना त्याचा हात वर गेला आणि तो थेट 11KV वायरला स्पर्श झाला, त्यामुळे त्याला विजेचा जोरदार धक्का बसल्याने तो मालगाडीच्या बोगीखाली पडला. यामुळे तो गंभीर भाजला व जखमी झाला.

उपचारादरम्यान मृत्यू झाला

रेल्वे प्रोटेक्शन फोर्सच्या अधिकाऱ्यांनी त्यांना तात्काळ मदत करून रायगडा जिल्हा मुख्यालय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. जीआरपीने त्याचा मोबाईल फोन मधून नंबर घेऊन त्याच्या कुटुंबीयांना या दुःखद घटनेची माहिती दिली. पोलिसांनी शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!