Headlines
Home » राष्ट्रीय » समुद्री सामर्थ्याचा नवा अध्याय! शक्तिशाली आणि आत्मनिर्भर भारताच्या ३ जहाजांचे जलावतरण

समुद्री सामर्थ्याचा नवा अध्याय! शक्तिशाली आणि आत्मनिर्भर भारताच्या ३ जहाजांचे जलावतरण

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारतात निर्मित सुरत आणि निलगिरी (युद्धनौका) तसेच वाघशीर (पाणबुडी) या तीन महत्त्वाच्या जहाजांचे राष्ट्राला समर्पण करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमीतून भारतीय नौदलाने एकाच वेळी युद्धनौका, विनाशिका आणि पाणबुडी कार्यान्वित करून स्वावलंबनाच्या दिशेने केलेली ही ऐतिहासिक वाटचाल आहे.

‘मेक इन इंडिया’ योजनेच्या माध्यमातून संरक्षण सामग्रीच्या निर्यातीमध्ये भारताने मोठे यश मिळवले आहे, ज्यामुळे भारत आर्थिक प्रगतीकडे झेपावत आहे असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले.

याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा प्रसंग भारताच्या सागरी शक्तीच्या बळकटीचा मोठा टप्पा असल्याचे संगितले. यामुळे भारतीय नौदलाची ताकद वाढली असून, आत्मनिर्भर भारताच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले गेले असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

आज भारत जागतिक स्तरावर, विशेषतः दक्षिणेत एक विश्वासार्ह आणि जबाबदार भागीदार म्हणून ओळखला जातो तसेच भारत विस्तारवादाच्या नव्हे तर विकासवादाच्या भावनेने काम करतो हे त्यांनी स्पष्ट केले. भारताने नेहमीच खुल्या, सुरक्षित, समावेशक आणि समृद्ध इंडो-पॅसिफिक प्रदेशाचे समर्थन केले असल्याचे देखील यावेळी पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी पंतप्रधानांसमवेत राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री संजय सेठ, नौसेना प्रमुख तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!