Headlines
Home » राष्ट्रीय » खासदार पप्पू यादव यांनी आपली सुरक्षा वाढवण्याची केली मागणी ; लॉरेंस गँगकडून धमकी !

खासदार पप्पू यादव यांनी आपली सुरक्षा वाढवण्याची केली मागणी ; लॉरेंस गँगकडून धमकी !

Threat to Pappu yadav : खासदार पप्पू यादव यांना अंडरवर्ल्ड गँगस्टर लॉरेन्स विश्नोई टोळीकडून जीवे मारण्याच्या धमक्या आल्यानंतर पोलीस विभाग सतर्क आहे. पूर्णिया मध्ये एसपी कार्तिकेय के शर्मा यांनी सांगितले की, स्थानिक पातळीवर त्यांची सुरक्षा वाढवण्यात येत आहे.

बिहार ( वास्तव पोस्ट ) : कुख्यात लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून धमकी मिळाल्यानंतर आता खासदार पप्पू यादव यांनी सुरक्षा वाढवण्याची मागणी केली आहे. यासाठी पप्पू यादव यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिल्याची माहिती समोर येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राजेश रंजन उर्फ पप्पू यादव यांनी केंद्रीय मंत्र्याला लिहिलेल्या पत्रात त्यांनी बिश्नोई टोळीकडून मिळालेल्या धमकीचाही उल्लेख केला आहे. पप्पू यादवने आपल्या पत्रात म्हटले आहे की, सध्या त्यांना वाय श्रेणीची सुरक्षा दिली जात आहे, परंतु धमक्या मिळाल्यामुळे त्यांच्या जीवाला धोका असून माझी सुरक्षा वाढवली नाही तर माझी कधीही हत्या होऊ शकते, असे पप्पू यादवने यांचे म्हणणे आहे. म्हणून मला झेड श्रेणीची सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी केली आहे.

पप्पू यादव यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, ‘आज लॉरेन्स बिश्नोई टोळी देशात सातत्याने घटना घडवत आहे. राजकीय व्यक्ती असल्याने मी या घटनेचा निषेध केला. मी विरोध केल्यास मला जीवे मारण्याची धमकी लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या प्रमुखाने मोबाईलवर दिली आहे. एवढी गंभीर जीवे मारण्याची धमकी देऊनही बिहार आणि केंद्रीय गृहमंत्रालय माझ्या सुरक्षेबाबत निष्क्रिय असल्याचे दिसते. माझ्या हत्येनंतरच लोकसभेत आणि विधानसभेत शोक व्यक्त करण्यासाठी लोक सक्रिय होतील, असे दिसते.

वास्तविक, खासदार पप्पू यादव यांनी काही वेळापूर्वी बॉलीवूड अभिनेता सलमान खानशी संवाद साधला होता आणि मी प्रत्येक परिस्थितीत त्याच्यासोबत असल्याचे सांगितले होते. सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून मिळणाऱ्या धमक्यांदरम्यान पूर्णियाचे खासदार पप्पू यादव बॉलिवूड अभिनेता सलमान खानला भेटण्यासाठी मुंबईत आले होते, मात्र सलमानच्या व्यस्त शेड्युलमुळे भेटू शकला नाही. मात्र, दोघांमध्ये फोनवर खूप वेळ चर्चा झाली, ज्याची माहिती स्वतः पप्पू यादव यांनी सोशल मीडिया X वर दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!