मुंबई ( वास्तव पोस्ट ) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मराठवाडा, विदर्भ, पुणे, पनवेल येथे १ लाख १७ हजार २२० कोटी रुपये गुंतवणुकीच्या ४ विशाल प्रकल्पांना उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमिती बैठकीत मान्यता दिली. या प्रकल्पांमुळे २९ हजार रोजगार निर्मिती होईल. राज्यात सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रिक वाहन निर्मिती क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार असल्याने राज्य इलेक्ट्रिक वाहन निर्मितीमध्ये अग्रेसर होणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.
मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. उद्योग मंत्री उदय सामंत (दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून) मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव डॉ. आय. एस चहल, अपर मुख्य सचिव विकास खारगे, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे उपस्थित होते.