Home » महाराष्ट्र » आयटी पार्क हिंजवडी येथून ३७ कंपन्या गेल्या राज्याबाहेर

आयटी पार्क हिंजवडी येथून ३७ कंपन्या गेल्या राज्याबाहेर

पुणे ( वास्तव पोस्ट न्यूज ) : पिंपरी चिंचवड हिंजवडी येथील अनेक कंपन्या वाहतूक कोंडीच्या समस्येमुळं स्थलांतरित होत आहेत. आशियातील सर्वात मोठे आयटी हब असलेल्या पिंपरी चिंचवड हिंजवडी या ठिकाणी एकूण १५० कंपन्या असून पाच लाख कर्मचारी येथे काम करतात. या निमित्ताने हिंजवडीत परिसरात एक लाखाहुन अधिक कार आणि इतर वाहने कामासाठी ये जा करतात. गेल्या दहा वर्षापासून येथे वाहतूकची कोंडी मोठ्या प्रमाणावर होतं आहे. एक किलोमीटर अंतर कापण्यासाठी एक तास लागत असल्याने कर्मचारी ऑफिस वर्क पेक्षा वर्क फ्रॉम होमला प्राधान्य देत आहेत किंवा तशी ते मागणी करत आहेत.

वाहतूकीच्या समस्येमुळे याठिकाणच्या १५० पैकी तब्बल ३७ कंपन्या राज्याबाहेर गेल्या आहेत. भारतातील सर्वात जास्त चारचाकी, दुचाकी वाहने ही पुणे, पिंपरी चिंचवड मध्ये आहेत. येथील आयटी कर्मचाऱ्यांमध्ये महिला मुलींचे प्रमाण जास्त आहे. या सर्वांना स्वतःच्या गाड्या घेऊन कामावर यावं लागते

पिंपरी चिंचवड पुण्यामध्ये मेट्रो प्रकल्पावर १३ हजार कोटी रुपये खर्च करूनही २००८ पासून सुरुवात केलेला हा सार्वजनिक वाहतूक सेवेचा प्रकल्प पांढरा हत्ती ठरत आहे. कारण या प्रकल्पाचा फायदा हिंजवडी आयटीच्या तिन्ही फेजला तसेच नव्याने उभारणी केलेल्या चाकण, तळेगाव औद्योगिक कंपन्यांना होणार नसल्याने चाकण, तळेगाव एमआयडीसीतील कंपन्या आणि कामगार त्रस्त आहेत. आयटी कंपनीतील एकूण अंदाजे चार लाख कामगारांना कामावर जाण्यासाठी सार्वजनिक वाहतूक सेवा सक्षम नसल्याने कामगारांनी स्वमालकीच्या दुचाकी, चारचाकी घेतल्याने रस्त्यावर वाहने वाढलीत.

गेल्या तीन दशकात गरवारे, टाटा मोटर्स, बजाज, फोर्स मोटर्स, इंडियन कार्ड क्लोदींग, फर्माईका, जनरल मोटर्स, टाटा नॅनो प्लांट आदी अनेक कंपन्यांनी शहर सोडलं आहे, रबर,प्लास्टिक, फौंड्री व इतर पुरवठादार कंपन्या गुजरात, तामिळनाडू, उत्तराखंड येथे स्थलांतरित झाल्या आहेत. इथे कंपन्यांची आणि नागरिकांची मागणी असूनही मागील तीन दशकात आंतरराष्ट्रीय विमानतळ होऊ शकला नाही, याला संकुचित राजकारण कारणीभूत आहे.

दरम्यान या सगळ्या कारभारामुळेच ३७ कंपन्या राज्याबाहेर स्थलांतरीत केरळ, गोवा, तामिळनाडू, गुजरात, आंध्रप्रदेश, कर्नाटक येथे उद्योग आणि नागरिकांसाठी आंतरराष्ट्रीय, मालवाहू प्रवासी विमान वाहतूक यासाठी मागील तीन दशकात मोठं विमानतळ निर्माण करण्यात आलं. हिंजवडी आयटी पार्कमध्ये इन्फोसीस, विप्रो, टीसीयस, महिंद्रा, टीसीएस अशा अनेक नामांकित कंपन्या आहेत. या ठिकाणी हजारोच्या संख्येने राज्यभरातील तसेच देशभरातील लोक काम करतात. मात्र, हे कर्मचारी वाहतूक कोंडीत अडकत असल्यानं कंपन्यांचं आर्थिक नुकसान होत आहे. पावसाळ्यात तर वाहतूक कोंडीची समस्या अजून गंभीर होते. त्यामुळं ३७ कंपन्या राज्याबाहेर स्थलांतरीत होत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!