मालवण येथे शिवकालीन किल्ल्यांच्या अभ्यासासाठी अध्यासन केंद्र : मंत्री आशिष शेलार
वास्तव पोस्ट l मुंबई : सिंधुदुर्गातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवकालीन सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग, राजकोट आणि सर्जेकोट या चार किल्ल्यांच्या सखोल अभ्यासासाठी मुंबई विद्यापीठअंतर्गत स्वतंत्र अध्यासन केंद्र उभारण्यात येणार असून त्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाकडून निधीला मंजुरी देण्यात आली आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी दिली. या निर्णयामुळे सिंधुदुर्गातील किल्ल्यांच्या अभ्यास, संशोधन आणि दस्तावेजीकरणाला नवी…
