Headlines
Home » राष्ट्रीय » हाथरसच्या सत्संगमध्ये चेंगराचेंगरी होऊन १०७ जणांचा मृत्यू !

हाथरसच्या सत्संगमध्ये चेंगराचेंगरी होऊन १०७ जणांचा मृत्यू !

Hathras Stampede : हाथरसच्या सत्संगमध्ये चेंगराचेंगरी होऊन १०७ जणांचा मृत्यू झाला. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. घटनेच्या चौकशी साठी एक उच्चस्तरीय समिती स्थापित करण्यात आली आहे. हाथरस मध्ये भोले बाबांच्या सत्संगा दरम्यान चेंगराचेंगरी होऊन ही दुर्घटना घडली.

हाथरस ( वास्तव पोस्ट न्यूज ) : भोले बाबांच्या सत्संगादरम्यान उत्तर प्रदेश मधील हाथरस येथे चेंगराचेंगरी होऊन दुर्घटना घडली. या चेंगराचेंगरीत १०७ हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे. हाथरसमध्ये झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची दाट शक्यता आहे. भोले बाबांचे प्रवचन ऐकण्यासाठी हाथरस एटा सीमेजवळील रतिभानपूर येथे मोठ्या संख्येने लोक जमले होते. या सत्संगासाठी हजारो लोक उपस्थित होते.

दरम्यान, घटनास्थळी उपस्थित लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांची संख्या अधिक आहे आणि अद्यापही अनेक जण बेशुद्ध अवस्थेत आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेची तातडीने दखल घेतली असून संपूर्ण घटनेचा अहवाल मागविण्यात आला आहे.

सत्संग मंडपातील उष्णतेमुळे लोक मंडपातून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात असताना चेंगराचेंगरी झाल्याचे सांगण्यात येत आहे. या दुघर्टनेत आतापर्यंत मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. घटनास्थळी पोलीस प्रशासन आणि रुग्णवाहिका पोहोचण्यास बराच विलंब झाला. स्थानिक लोकांनी जखमींना जवळच्या हॉस्पिटल आणि एटा हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.

हाथरसचे डीएम आशिष कुमार यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितलं की, “जिल्हा प्रशासन या प्रकरणाची चौकशी करत आहे. जखमींना रुग्णालयात नेलं जात आहे आणि जखमींवर उपचार सुरु आहेत. या कार्यक्रमासाठी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी (SDM) परवानगी दिली होती आणि हा एक खाजगी कार्यक्रम होता. या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यासंदर्भात ट्वीट करत संवेदना व्यक्त केली आहे. दरम्यान उत्तर प्रदेश सरकारचे मंत्री लक्ष्मी नारायण चौधरी, संदीप सिंह घटनास्थळी रवाना झाले आहेत आणि त्यांनी राज्याचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांना निर्देश दिले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!