Home » जळगाव » वाहतूक शाखेचे कर्तव्यनिष्ठ पोलीस दिपक बनसोडे – “हेल्मेट घाला, जीवन वाचवा”

वाहतूक शाखेचे कर्तव्यनिष्ठ पोलीस दिपक बनसोडे – “हेल्मेट घाला, जीवन वाचवा”

वास्तव पोस्ट | जळगाव : शहरातील वाहतुक शाखेचे कार्यरत कर्मचारी पोलीस शहराच्या गजबजत हॉर्नच्या आवाजात आणि धावपळीच्या जीवनात एक व्यक्ती शांतपणे आपले कर्तव्य बजावत उभे असतात वाहतूक शाखेचे कार्यरत पोलीस दिपक बनसोडे. चौकात सिग्नल लागला की अनेक जण घाईत नियम मोडण्याचा प्रयत्न करतात. काही जण हेल्मेट न घालता “थोडंच अंतर आहे” म्हणून प्रवास करतात. पण त्या प्रत्येकाला प्रेमळ शब्दात थांबवून दिपक बनसोडे सांगतात “हेल्मेट डोक्यात घाला, प्रवास सुखकर होईल… आणि सुरक्षितही!” ही केवळ सूचना नसते, तर ती एका जबाबदार अधिकाऱ्याची, एका कुटुंबवत्सल माणसाची काळजी असते.

हेल्मेट म्हणजे जीवनाची सुरक्षा

आज अनेक अपघात हे फक्त माणसाच्या निष्काळजीपणामुळे होतात. डोक्याला मार लागल्यामुळे मृत्यू होऊन कित्येक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झालेले आपण पाहतो. दिपक बनसोडे यांना माहित आहे की, एक हेल्मेट–जीव वाचवू शकते. कुटुंबाचे अश्रू थांबवू शकते, तसेच भविष्य देखील सुरक्षित करू शकते ते जेव्हा मोटरसायकल चालकाला थांबवतात, तेव्हा त्यांच्या आवाजात कठोरपणा नसतो. असते ती जाणीव आणि जबाबदारी.

चौकात उभा असलेला रक्षक शहरातील विविध चौकांवर, सिग्नलजवळ ते दक्षपणे उभे असतात. लाल सिग्नल म्हणजे थांबा, हिरवा म्हणजे पुढे जा – हा साधा नियम अनेकदा दुर्लक्षित होतो. पण दिपक बनसोडे प्रत्येक वाहनचालकाला समजावतात –सिग्नल बघून नियम पाळा. तुमची घाई कोणाचं आयुष्य हिरावून घेऊ शकते”. ते फक्त दंड आकारत नाहीत, तर जनजागृती करतात. शाळकरी मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत प्रत्येकाला सुरक्षिततेचा संदेश देतात.

पोलीस म्हणजे भीती नव्हे – विश्वास

समाजात अनेकदा पोलीस म्हणजे भीती अशी भावना निर्माण होते. पण दिपक बनसोडे यांसारखे अधिकारी त्या प्रतिमेला बदलतात. त्यांची कार्यपद्धती सांगते -पोलीस म्हणजे संरक्षण, पोलीस म्हणजे शिस्त, पोलीस म्हणजे समाजाचे आधारस्तंभ एका शब्दामागे असते माणुसकी जेव्हा ते एखाद्या युवकाला थांबवून म्हणतात, “भाऊ, हेल्मेट घाला”,तेव्हा त्या शब्दात एक भाव असतो —तू सुरक्षित राहा, तुझं घर सुरक्षित राहो. त्यांच्या या कार्यामुळे शहरातील अनेक तरुणांमध्ये वाहतूक नियमांविषयी जागरूकता वाढली आहे.

समाजासाठी प्रेरणा

दिपक बनसोडे यांचे काम हे फक्त सरकारी कर्तव्य नाही, ती एक सामाजिक जबाबदारी आहे.रस्त्यावर उभा असलेला प्रत्येक पोलीस हा आपल्या कुटुंबासाठी नाही तर संपूर्ण शहरासाठी उभा असतो. आज गरज आहे ती आपण सर्वांनी त्यांच्या सूचनांचा आदर करण्याची हेल्मेट घालण्याची सिग्नल पाळण्याची वाहतूक नियमांचे पालन करण्याची

शेवटचा संदेश

“हेल्मेट डोक्यात घाला, प्रवास सुखकर होईल”ही केवळ सूचना नाही, तर ती जीवन वाचवणारी शिकवण आहे. वाहतूक शाखेचे कार्यरत पोलीस दिपक बनसोडे यांसारखे कर्तव्यदक्ष अधिकारी आपल्या शहराचे खरे हिरो आहेत.
त्यांच्या या सेवेला सलाम…

दिपक जाधव, जळगाव
संपादक, वास्तव पोस्ट .

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!